जास्त तिखट खाणं पडू शकतं महागात, कधीही होऊ शकतो हा आजार

जास्त तिखट खाणं पडू शकतं महागात, कधीही होऊ शकतो हा आजार

अनेकांना तिखट, झणझणीत जेवण जेवायची सवय असते. जेवणात जरा तरी तिखट कमी असेल तर त्यांना जेवण रुचकर लागत नाही.

  • Share this:

अनेकांना तिखट, झणझणीत जेवण जेवायची सवय असते. जेवणात जरा तरी तिखट कमी असेल तर त्यांना जेवण रुचकर लागत नाही. तिखट खाताना भलेही कितीही घाम किंवा डोळ्यांतून पाणी येऊ दे, ते तरीही तिखट खाणं सोडत नाहीत. दरवर्षी स्कॉटलंडमध्ये तिखट खाण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत जगातील सर्वात तिखट पदार्थ 'किलर करी' खावा लागतो. यात अनेकजण उत्साहाने भाग घेतात, पण कोणालाही हा पदार्थ पूर्ण खाण्यात यश आलेलं नाही. अनेकांना रुग्णालयातही दाखल करावं लागलं. अशात जर तुम्हालाही तिखट खाणं आवडत असेल तर जरा सांभाळून. एका संशोधनानुसार, दररोज 50 ग्रॅम मिर्ची खाल्यास डिमेंशिया हा आजार होण्याचा धोका असतो.

काय आहे डिमेंशिया?

डिमेंशिया हा एक मानसिक आजार आहे. अनेक आजारांमुळे डिमेंशियाची लक्षणं दिसून येतात. हे सगळे आजार मेंदूला इजा पोहोचवतात. यात रुग्णाची स्मरणशक्ती कमकूवत होते.

डिमेंशियाची लक्षणं

महत्त्वाच्या गोष्टी विसरणं, त्यातही नुकतीच घडलेली घटना विसरणं

स्वतःमध्येच राहणं, गप्प राहणं आणि भेटी- गाठी बंद करणं

छोट्या- छोट्या गोष्टींवर आणि कारण नसतानाही चिडचिड करणं, ओरडणं, रडणं

कतार विद्यापीठातील संशोधक जुमिन शी यांच्या नेतृत्वाखाली 55 वर्ष आणि त्याहून जास्त वयाच्या 4 हजार 572 चिनी लोकांवर संशोधन करण्यात आलं. यात त्या लोकांची स्मरणशक्ती झपाट्याने कमकूवत होताना दिसली जे जररोज 50 ग्रॅम किंवा त्याहून जास्त तिखट खातात. दररोज तिखट खाणाऱ्यांना स्मरणशक्ती कमकूवत होण्याचा धोका इतरांपेक्षा दुप्पट असतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

भारताशिवाय या 5 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो गोकुळाष्टमी

ऐकावं ते नवल! नवऱ्याचं अतीप्रेम झालं असह्य, पत्नीने केली घटस्फोटाची मागणी

रिलेशनशिपमध्ये असतानाही का पडतात दुसऱ्यांच्या प्रेमात?

सोलो ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहेत या 4 जागा

300 फूट खोल सप्तकुंड धबधब्यात पडला पर्यटक; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 04:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading