OMG! शेतात पकडत होता साप आणि...पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

OMG! शेतात पकडत होता साप आणि...पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही, नक्की काय झालं ते.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : साप हा असा सरपटणारा प्राणी आहे, ज्याला पाहून कोणालाही त्याची भिती वाटेल. त्यामुळं सर्पमित्र वगळता कोणीही सापांना पकडण्याची हिम्मत करणार नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर केला आहे पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांजनं. दिलजीत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. मात्र काही दिवसांपूर्वी त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओमुळं खळबळ माजत आहे.

दिलजीतनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक प्रॅंक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोटधरून हसाल. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ति शेतात हातांनी काही तरी काढण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पाहून ही व्यक्ति शेतातून साप काढत असल्याचा भास होत आहे. मागे लोकांच्या घाबरण्याचा आवाजही येत आहे. या सगळ्यात हा मनुष्य अगदी घाबरत पण हिम्मत दाखवत शेतातून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यानं शेतातून काय काढलं हे पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

वाचा-Viral Photo: मिलिंद सोमणने केलं अण्डरवॉटर रनिंग, पाठीवर होतं 12 किलोचं वजन

या व्यक्तिनं हळु-हळु शेतातून काही तरी बाहेर काढले आणि काय बाहेर आले हे पाहून तुम्हाला हसु आवरता येणार आहे. या व्हिडीओ म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखं आहे. या व्य़क्तिनं साप नाही तर शेतातून बेल्ट बाहेर काढला.

 

View this post on Instagram

 

Shaa Baa Shey... 👏🏽👏🏽

A post shared by Diljit Dosanjh (@diljitdosanjh) on

वाचा-जवानाचा दबंग अवतार! दोन बोटांनी किंग कोब्राला लावलं पळवून, पाहा VIRAL VIDEO

या व्हिडीओवर दिलजीतनं शाब्बास…असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिलजीत सध्या पंजाबी आणि हिंदी सिनेमात काम करत आहे. याआधी उडता पंजाब या सिनेमात करिना कपूर खानसोबत दिलजीत दिसला होता. आता पुन्हा एकदा गुड न्यूज या चित्रपटाच्या निमित्तानं करिनासोबत काम करणार आहे.

वाचा-पहावं ते नवलंच! खिडकीची काच तोडून महिलेवर सांबारने मारली उडी, VIDEO VIRAL

VIDEO : पैशांचा एवढा पाऊस झाला की नोटा मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2019 01:19 PM IST

ताज्या बातम्या