मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Life@25 - कंपनी पगार वेळेत देत नाही किंवा उशिरा देते, मग काय करायचं?

Life@25 - कंपनी पगार वेळेत देत नाही किंवा उशिरा देते, मग काय करायचं?

कंपनीकडून मिळणाऱ्या पगाराबाबत कायदा काय सांगतो? (प्रतीकात्मक फोटो सौजन्य - Shutterstock)

कंपनीकडून मिळणाऱ्या पगाराबाबत कायदा काय सांगतो? (प्रतीकात्मक फोटो सौजन्य - Shutterstock)

तुम्ही नोकरी करत असाल आणि कंपनी सातत्याने पगार थकवत असेल किंवा उशिरा देत असेल तर त्यात कायद्यात काय तरतूद आहे?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

"नुकतीच एक कंपनी नव्याने सुरू झाली आहे. मीसुद्धा फ्रेशर आहे. त्यामुळे कामाचा अनुभव मिळावा म्हणून या कंपनीत मी जॉईन झालो. कंपनीने सुरुवातीचे दोन-तीन महिने पगार नीट दिला. पण आता मात्र पगार उशिराने मिळतो. एका महिन्याचा पगार दोन-तीन महिन्यांनी  पगार मिळतो. माझं ठिक आहे पण कंपनीत इतर असे कर्मचारी आहे ज्यांचं कुटुंब त्यांच्या पगारावरच चालतं. त्यांच्या घरात दुसरं कुणी कमावणारं नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो"

"कंपनीने कर्मचाऱ्यांना असा उशीरा पगार देणं योग्य आहे का? याबाबत काही कायदा आहे का? कर्मचाऱ्यांना अशा वेळी काय हक्क असतो?"

अॅड. सुजाता डाळींबकर : कोणत्याही कंपनीत जॉईन होण्याअगोदर तुमच्यासोबत एक काँट्रक्ट साईन केलं जातं. याची एक प्रत तुमच्याकडेही असते. त्यामध्ये तुमच्या पगाराविषयी आणि इतर नियमांविषयी माहिती दिलेली असते. या अटींना दोघंही बांधिल असतात. त्यामुळे कोणतीही कंपनी अशाप्रकारे तुमचा पगार रोखत असेल किंवा उशीरा देत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे"

अशा स्थितीत तुमच्यासोबत अशी घटना घडली तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत?

कामगार आयुक्त

कंपनीने तुमचा पगार दिला नाही, तर तुम्ही कामगार आयुक्त विभागाशी संपर्क साधू शकता. कामगार आयुक्त तुमचा प्रश्न पूर्णपणे ऐकून घेतील आणि ते सोडवण्यास मदत करतील. कामगार आयुक्तांद्वारे तुमच्या पगाराच्या समस्येवर कोणताही तोडगा न निघाल्यास, कामगार आयुक्त तुमचा पगाराचा मुद्दा न्यायालयात पाठवतील, जो तुमच्या नियोक्त्याविरुद्ध दाखल केला जाऊ शकतो.

हे वाचा - Life@25 : लग्नानंतर मुलीने आडनाव बदलणं बंधनकारक आहे का?

कायदेशीर नोटीस

तुम्ही वकिलाच्या मदतीने तुमच्या कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून तुमचा पगार देण्याची मागणी करू शकता. नोटीसमध्ये, तुम्हाला सर्व माहिती द्यावी लागेल जेणेकरुन हे सिद्ध होईल की तुम्ही त्या कंपनीसाठी काम करत आहात. तरीही कंपनीने दाद दिली नाही तर तुम्ही कंपनीविरोधात खटला भरून तुमच्या पगाराची मागणी करू शकता. औद्योगिक विवाद कायदा, 1947 च्या कलम 33 (सी) अंतर्गत, कर्मचारी पगार वसुलीसाठी दावा दाखल करू शकतो.

हे वाचा - Digital Prime Time : कायद्याचा बोला! गणेशोत्सवात उत्साह हवाच पण वाट्टेल तितक्या मोठ्या आवाजात गाणी लावली तर काय?

शिक्षेची तरतूद काय आहे?

भारतीय दंड संहिता, 1860 जर कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याचा पगार दिला नाही तर तो त्याच्या कंपनीविरुद्ध भारतीय दंड संहिता अंतर्गत फौजदारी खटला दाखल करू शकतो. कंपनी कायदा, 2013 चे कलम 447 नुसार जर कोणतीही कंपनी फसव्या किंवा अप्रामाणिक हेतूने कर्मचार्‍याचा पगार देत नसेल, तर मालकाला सहा महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी कारावासाची शिक्षा होऊ शकते, जी दहा वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. दंड देखील भरावा लागेल जो फसवणुकीच्या रकमेच्या तिप्पट असू शकतो.

First published:

Tags: Digital prime time, Law, Lifestyle