मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Life@25 : कॅब ड्रायव्हरने अचानक राइड रद्द केल्यास काय करायचं?

Life@25 : कॅब ड्रायव्हरने अचानक राइड रद्द केल्यास काय करायचं?

प्रतीकात्मक फोटो सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो सौजन्य - Canva)

काही वेळा कॅब ड्रायव्हर ऐन वेळेला अचानक राइड रद्द करतात. यामुळे प्रवाशाची गैरसोय होते.

  • Published by:  Priya Lad
ट्रेनचा प्रवास नको, बससाठी ताटकळत वाट पाहायला नको, रिक्षा-टॅक्सीवाल्यांना विनवण्या नको म्हणून अनेक जण कॅब सेवा वापरतात. म्हणजे अॅप वरून कॅब बुक करतात आणि अगदी आपल्याला हव्या त्या ठिकाणी गाडी बोलावून हवं तिथं जाता. सार्वजनिक वाहतूक आणि प्रायव्हेट गाडी यातील हा प्रवासाचा मधला मार्ग. पण बऱ्याचदा कॅब सेवेचा वाईट अनुभव अनेकांना आला आहे. कॅब बुक केल्यानंतर सुरुवातीला ती कन्फर्म होते. पण काही वेळा कॅब ड्रायव्हर ऐन वेळेला अचानक राइड रद्द करतात. यामुळे इतका वेळ कॅबची प्रतीक्षा करणाऱ्या आणि कॅब मिळणार म्हणून निश्चिंत असणाऱ्या प्रवाशाची गैरसोय होते. अशावेळी खूप राग येतो. कॅब ड्रायव्हरने अशी अचानक राइड रद्द करण्याचा त्यांना अधिकार असतो का? असं झाल्यास प्रवाशांनी नेमकं काय करावं? कुठे आणि कशी तक्रार करावी? अ‍ॅड. सुजाता डाळींबकर, कायदेशीर सल्लागार - अनेकदा तुम्ही प्रवास करताना ऑनलाईन कॅब बूक करता. मात्र, काहीवेळा कॅब ड्रायव्हर तुमची राईड ऐनवेळी रद्द करतात. अशावेळी मोठा मनस्थाप होतो. पण, अशावेळी काय करायचं हे अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करुन नवीन कॅब शोधतात. पण, तुमच्यासोबत असं काही घडलं तर तुम्ही त्याची रितसर तक्रार नोंदवू शकता. हे वाचा - Life@25 : लंच ब्रेक म्हणून बँक कर्मचारी ग्राहकांना ताटकळत ठेवू शकतात का? सर्वात आधी तुम्ही ज्या कंपनीची कॅब बूक केली आहे. त्या कंपनीच्या अधिकृत एप किंवा वेबसाईटवर तक्रार नोंदवू शकता. उदाहरणार्थ भारतात ओला, उबेर कंपनींनी आपल्या ग्राहकांना अशी सोय उपलब्ध करुन दिली आहे. तुमच्या तक्रारीत तथ्य असेल तर कंपनी योग्य ती कारवाई करते. मात्र, कंपनीच्या कारवाईने तुमचं समाधान झालं नाही किंवा कंपनीने दुर्लक्ष केलं तर तुमच्याकडे आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. हे वाचा - Life@25 : शॉपिंग करताना लूट; विक्रेत्याने MRP पेक्षा जास्त पैसे घेतले तर काय करायचं? जर सदर कंपनीने तुमच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर तुम्ही ग्राहक न्यायालयात ऑनलाईन किंवा फोन करुन तक्रार नोंदवू शकता. तुमची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही 1800-11-4000 किंवा 1915 वर कॉल करू शकता. येथे त्याचे संभाव्य उपाय किंवा पुढे काय करायचे आहे, ही माहिती दिली जाईल. तुम्ही http://consumerhelpline.gov.in/ या पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्ही तुमची तक्रार माहिती, कंपनीचे नाव आणि विवाद संबंधित कागदपत्रे देखील संलग्न करू.
First published:

Tags: Digital prime time, Law, Lifestyle

पुढील बातम्या