मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Life@25 : लंच ब्रेक म्हणून बँक कर्मचारी ग्राहकांना ताटकळत ठेवू शकतात का?

Life@25 : लंच ब्रेक म्हणून बँक कर्मचारी ग्राहकांना ताटकळत ठेवू शकतात का?

बँक कर्मचाऱ्यांच्या लंच ब्रेकबाबत नियम काय? (प्रतीकात्मक फोटो सौजन्य - Canva)

बँक कर्मचाऱ्यांच्या लंच ब्रेकबाबत नियम काय? (प्रतीकात्मक फोटो सौजन्य - Canva)

आता जेवणाची वेळ झाली नंतर या असं म्हणून बँक कर्मचारी ग्राहकांचं कोणतंच काम करत नाहीत.

  • Published by:  Priya Lad
"दुपारी ऑफिसला जाता जाता बँकेची कामं आटोपायची म्हटली की दुपारच्या वेळेला बँक काही कालावधीसाठी बंद असते. एक वाजला की बँकेचं शटर डाऊन होतं. कारण काय तर लंच ब्रेक. दुपारचं जेवण करण्यासाठी संपूर्ण बँकेतील कर्मचारी बँकेचं काम थांबून एकत्र जेवण करतात. त्यामुळे ग्राहकांना बँकेबाहेर ताटकळत राहावं लागतं. ग्राहकांना पुढच्या कामांना उशीर होतो किंवा बँकांची पुढील कामं रखडतात" "बँक कर्मचाऱ्यांना असा एकत्र लंच ब्रेक घेता येतो का? बँकेसाठी लंच ब्रेकचा नियम काय आहे? बँकेतील कर्मचाऱ्यांचं असं वागणं जर नियमांचं उल्लंघन असेल तर त्यासाठी काय कायदा आहे?, कायद्यात काय तरतूद आहे?, अशावेळी ग्राहक काय करू शकतात?, कुठे आणि कशी तक्रार करायची?" अ‍ॅड. सुजाता डाळींबकर, कायदेशीर सल्लागार -  अनेकवेळा असं घडतं की तुम्ही बँकेत गेलात आणि कर्मचारी तुम्हाला सांगतो की आता जेवण सुरू आहे, नंतर या. अनेकवेळा बराच वेळ थांबूनही ते जागेवर परतत नाहीत, त्यामुळे तुमचा बहुमोल वेळ वाया जातो, तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागतो. हे वाचा - Life@25 : शॉपिंग करताना लूट; विक्रेत्याने MRP पेक्षा जास्त पैसे घेतले तर काय करायचं? आरबीआयने 10 मार्च 2007 रोजी एका आरटीआयला उत्तर देताना म्हटलं होतं की, RBI बँकिंग नियमन विभाग (DBR) ने बँकांसाठी दुपारच्या जेवणाची वेळ निर्धारित केलेली नाही. बँक कर्मचारी एकत्र जेवणाला जाऊ शकत नाहीत. ते एक एक करून लंच ब्रेक घेऊ शकतात. यादरम्यान, सामान्य व्यवहार चालू ठेवावेत. ग्राहकांना तासनतास थांबायला लावणं कायद्याच्या विरोधात आहे. जर तुमच्यासोबत असं झालं तर तुम्ही याविरोधात तक्रार नोंदवू शकता. कुठे तक्रार कराल? जर बँक कर्मचारी काम करत नसेल तर बँकेच्या हेल्पलाइन नंबरवरही तुम्ही कर्मचाऱ्याची तक्रार करू शकता. तुमची तक्रार संपूर्ण शाखेबद्दल असली तरीही तुम्ही हे करू शकता. यासाठी बँका फोन नंबर जारी करतात. हे हेल्पलाइन क्रमांक तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर मिळेल. अनेक बँका ऑनलाइन तक्रारी दाखल करण्याची सेवाही देतात. तुम्ही बँकेच्या शाखा प्रमुखाकडेही तक्रार करू शकता. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक बँकेची स्वतःची यंत्रणा असते. याला तक्रार निवारण प्रणाली म्हणतात जेथे ग्राहक तक्रारी नोंदवू शकतात. तुम्ही बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकता. म्हणजेच जर बँक कर्मचारी तुमचे काम करण्यास नकार देत असतील तर तुम्ही त्याची तक्रार थेट बँकिंग लोकपालाकडे करू शकता. हे वाचा - Life@25 : सोशल मीडियावर कुणी आक्षेपार्ह कमेंट केली, धमकी दिली तर काय करायचं? https://Cms.Rbi.Org.In/ या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. किंवा बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 14448 असून, त्यावर कॉल करूनही ग्राहक तक्रारी करू शकतात.
First published:

Tags: Bank details, Bank services, Digital prime time, Law, Lifestyle

पुढील बातम्या