मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Law@25 : 'नवऱ्याचं रूप त्याच्या आईवडिलांसमोर अचानक बदलतं, माझ्यासोबत तो वेगळंच वागतो'

Law@25 : 'नवऱ्याचं रूप त्याच्या आईवडिलांसमोर अचानक बदलतं, माझ्यासोबत तो वेगळंच वागतो'

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

दोघं असताना एक आणि आईवडीलांसमोर दुसराच. नवरा नेमका कसा तेच समजेना.

  • Published by:  Priya Lad
"आमच्या लग्नाला एक वर्ष झालं. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. तो खूप प्रेमळ आणि काळजी घेणारा आहे यात वाद नाहीच. पण एक गोष्ट मला खटकते. जेव्हा आम्ही दोघंच असतो तेव्हा माझ्या नवऱ्याचं माझ्यावरील प्रेम अक्षरशः उफाळून जातं. पण जेव्हा त्याचे आई-वडील समोर असतात तेव्हा त्याचं रूप वेगगळंच असतं" "माझे सासू-सासरे गावात राहतात आणि आम्ही शहरात. काही महिन्यांनी ते काही दिवसांसाठी आमच्यासोबत राहायला येतात. पण त्यावेळी माझा रोमँटिक, केअरिंग नवरा अचानक बदलतो. नेहमीपेक्षा तो अगदी विरुद्ध वागतो. त्याचं माझ्यावर प्रेम नाही, तो माझी काळजी करत नाही, असं दाखवतो. माझ्यापेक्षा तो त्याच्या आईवडिलांसोबत जास्त वेळ घालवतो. मी काय करू?" टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कन्सलटंट सायकोलॉजिस्ट श्वेता सिंग - "तुमची जी परिस्थिती आहे, ती परिस्थती अनेक महिलांची आहे. भारतात सामान्यपणे भावना म्हणजे दुर्बलपणाचं लक्षण असल्याचं पुरुषांच्या मनावर बिंबवलं जातं. त्यामुळे जेव्हा त्यांना आपली भावनिक बाजू दाखवायची असते तेव्हा समाजाने बिंबवलं हेच मत आडवं येतं. जेव्हा तुमचा नवरा तुमच्यासोबत असतो. तेव्हा त्याला याची भीती नसते. पण जेव्हा तो त्याच्या पालकांसमोर असतो तेव्हा तो समाजाने घडवल्याप्रमाणे पुरुष बनतो. त्याचं मृदू मन तो समाजाला दाखवत नाही, ज्यात त्याचे पालकही येतात. फक्त तुमचाच नवरा नाही, सर्वच पुरुषांची ही परिस्थती आहे" हे वाचा - Life@25 : लग्नानंतर सासरची मंडळी माहेरी जाऊ देत नाहीत, काय करू? "आता राहिला तुमचा प्रश्न की या परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं. तर तुम्हाला खूप संयम आणि जुळवून घेण्याची गरज आहे. याबाबत तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बोला. त्याच्या बदलेल्या वर्तणुकीमुळे तुम्हाला काय वाटतं ते सांगा. तो तुम्हाला समजून घेईल अशी आशा, पण त्याच्या वागण्यात लगेच बदल होईल असं नाही. तोसुद्धा चांगला नवरा आणि चांगला मुलगा राहण्यासाठी तारेवरची कसरत करतो आहे. तुमच्याकडून त्याला मिळालेली छोटासा आधारही त्याला हा बॅलेन्स सावरण्यात मदत करेल"
First published:

Tags: Digital prime time, Lifestyle, Relationship

पुढील बातम्या