मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमची मुलं स्मार्टफोन, कॉम्प्युटरच्या आहारी गेली आहे? तर एकदा हा सर्व्हे वाचाच!

तुमची मुलं स्मार्टफोन, कॉम्प्युटरच्या आहारी गेली आहे? तर एकदा हा सर्व्हे वाचाच!

 काळाची गरज म्हणून मुलांच्या हातात स्मार्टफोन आणि अन्य उपकरणं दिली गेली असली तरी त्यात त्यांचा किती वेळ आणि कशासाठी जातो याकडे...

काळाची गरज म्हणून मुलांच्या हातात स्मार्टफोन आणि अन्य उपकरणं दिली गेली असली तरी त्यात त्यांचा किती वेळ आणि कशासाठी जातो याकडे...

काळाची गरज म्हणून मुलांच्या हातात स्मार्टफोन आणि अन्य उपकरणं दिली गेली असली तरी त्यात त्यांचा किती वेळ आणि कशासाठी जातो याकडे...

मुंबई, 01 डिसेंबर : कोविड आणि लॉकडाउननंतर (Covid) सगळ्यांचंच आयुष्य बदललं आहे. याला लहान मुलंही अपवाद नाहीत. काही वर्षांपूर्वीपर्यंत व्हिडिओ गेम्स (Video Games) हे लहान मुलांसाठी एक मुख्य आकर्षण असायचं. अनेक मुलं व्हिडिओ गेम्स खेळण्यावर बराच वेळ घालवायची. जास्त काळ व्हिडिओ गेम्स खेळणं मुलांच्या आरोग्यासाठी (Health) चांगलं नाही असं तेव्हा सांगितलं जायचं. आता मात्र मुलांची खेळणीही बदलली आहेत. आता मुलं त्यांचा बहुतेक वेळ कम्प्युटर (Computer), स्मार्टफोन (SmartPhone), टॅबलेट्स, टीव्ही (Televison) अशा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर काही बघण्यात किंवा त्यावर खेळण्यात घालवतात. कोरोनामुळे मोठ्यांना तर मोबाइल ही आवश्यक गोष्ट झाली आहे. पण लहान मुलांच्या हातातही आता खेळण्यांपेक्षा जास्त काळ स्मार्टफोन असतात. याचबद्दल foxnews.comमध्ये एक वृत्त प्रकाशित झालं आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरचं मल्टीटास्किंग लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं असं एका रिपोर्टमधून समोर आल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

लहान मुलांचं सर्वेक्षण

लहान मुलं आपला बहुतेक वेळ टीव्ही, कम्प्युटर, टॅब, स्मार्टफोन आणि व्हिडिओ गेम्ससारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर घालवतात असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. लक्झेम्बर्ग युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी डी. जेनेव्हमधल्या संशोधकांच्या एका टीमनं 8 ते 12 वयोगटातली 118 मुलं आणि मुलींचा अभ्यास केला. त्यातून हा अहवाल तयार करण्यात आला.

या मुलांचं लक्ष इलेक्ट्रॉनिक उपकरणं सोडून अन्य कोणत्या गोष्टींवर जास्त वेळ असतं याचाही अभ्यास यामध्ये करण्यात आला. त्यासाठी एक सर्वेक्षण प्रश्नावली तयार करण्यात आली होती. यामध्ये मुलांची झोप, ग्रेड, मानसिक आरोग्य याबद्दल पालकांकडून माहिती घेण्यात आली.

सर्वेक्षणाचा रिपोर्ट

मुलं किती वेळ इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर घालवतात याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही असं या सर्वेक्षणातून पुढं आलं; मात्र एकाच वेळेस जेव्हा मुलं एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरतात, त्याचा नक्कीच परिणाम होतो. उदाहरणार्थ टेस्क्ट किंवा मेसेज करत असताना टीव्ही बघणं. एकावेळेस जास्त गोष्टी करणं किंवा हाताळणं यामुळे मुलांमधला तणाव वाढू शकतो आणि आरोग्याच्या अन्य समस्याही निर्माण होऊ शकतात.

धुळे-नंदुरबार बँक अध्यक्ष निवडणुकीत राजवर्धन कदमबांडे चौथ्यांदा विजयी

या सर्व्हेमधून आणखीही एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. त्यानुसार आठ वर्षांच्या जवळपासची मुलं दिवसातले सुमारे साडेचार तास मल्टी-टास्किंगवर घालवतात. जसजशी ही मुलं मोठी होतात तसा हा वेळ जास्त झालेला पाहायला मिळतो. म्हणजेच बारा वर्षांची मुलं इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर दिवसातले जवळपास आठ तास घालवतात. आणखीही एक महत्त्वाची गोष्ट या रिपोर्टमधून पुढे आली आहे ती म्हणजे मुलींपेक्षा मुलांनी व्हिडिओ गेमवर जास्त वेळ घालवला आहे असं या सर्व्हेमधून स्पष्ट झालं आहे. एकूणच काळाची गरज म्हणून मुलांच्या हातात स्मार्टफोन आणि अन्य उपकरणं दिली गेली असली तरी त्यात त्यांचा किती वेळ आणि कशासाठी जातो याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Smart phone