• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • मधुमेह, कॅन्सर, हृदयरोग अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे सात्विक आहार

मधुमेह, कॅन्सर, हृदयरोग अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे सात्विक आहार

सात्विक आहाराचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी 5 मुख्य फायदे समजून घ्या.

 • myupchar
 • Last Updated :
 • Share this:
  आयुर्वेदानुसार ताजं, कमी वंगणयुक्त, शाकाहारी आणि पौष्टिक आहार हा सात्विक आहार मानला जातो. सात्विक आहार हा आहाराचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये अशा खाद्य पदार्थांचा समावेश आहे, जे मन आणि शरीर दोन्ही शांत करू शकतं. नियमितपणे योगासनं करणारे आपल्या जीवनशैलीत हा आहार प्रामुख्याने घेतात. खास गोष्ट अशी आहे की सात्विक आहाराचा अर्थ केवळ खाद्य पदार्थांपुरता मर्यादित नसून तो खाण्याच्या सवयीशी देखील संबंधित आहे. सात्विक अन्नाविषयी बोलताना, नियंत्रित राहण्याच्या आणि खाण्याच्या सवयींबद्दल आणि जास्त प्रमाणात खाणे टाळण्याविषयी बोलले जाते. myupchar.com च्या नुसार सात्विक, तामसिक आणि राजसिक असे तीन प्रकारचे अन्न आहेत. सात्विक अन्न शुद्ध आणि संतुलित असून शांती, शीतलता प्रदान करते, तर राजसिक अन्न उत्तेजक आहे आणि तामसिक अन्न हे आळशीपणा आणि अशक्तपणाचे आहे. सात्विक आहार हा मुख्यतः जीवनाची गुणवत्ता सुधारणे आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहे. हेच कारण आहे की याला योगिक आहारदेखील म्हटलं जातं, कारण हे निरोगी मन आणि शरीर चैतन्य प्रदान करण्यात मदत करते. सात्विक आहारामध्ये हंगामी म्हणजेच पावसाळी फळे आणि भाज्या, दूध आणि दुधाचे पदार्थ, अंकुरलेले धान्य, ताज्या फळांचा रस, डाळी, सुकामेवा, मध आणि वनौषधींपासून तयार केलेला चहा हे सर्व समाविष्ट आहेत. भाज्यांमध्ये लसूण आणि कांदा हा सात्विक आहार मानला जात नाही. अशा आहारामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, शिळे अन्न इत्यादींचा समावेश नाही. सात्विक आहाराचे 5 फायदे येथे जाणून घ्या :- पचन सुधारणे या आहारात राजस आणि तामसिक पदार्थांच्या सेवनापासून दूर ठेवलं जातं, कारण ते पित्त दोषाचं संतुलन बिघडवतात जे ऊर्जा, पचन आणि शरीराचं तापमान नियंत्रित करण्यास मदत करतं. सात्विक आहार या ऊर्जेला संतुलित ठेवतं ज्यामुळे पचन सुधारतं. विषाक्त पदार्थांना शरीराबाहेर काढतं सात्विक आहारात मांस, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, जास्त मीठ, चहाच्या पानांमध्ये किंवा कॉफीच्या बियांमध्ये असणारे उत्तेजक द्रव्य आणि मसालेदार पदार्थ यासारख्या पदार्थांना प्रतिबंधित केलं जातं. या पदार्थांना प्रतिबंधित केल्याने यकृताचा कार्यभार कमी होते आणि अशाप्रकारे ते विषाक्त पदार्थ बाहेर फेकण्यासाठी चांगलं कार्य करते. वजन कमी करण्यास उपयुक्त सात्विक आहार हा मुख्यत: शाकाहारी आहार असतो ज्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात आणि कमी चरबीयुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असलेले अन्न तृप्तीची भावना मनात निर्माण करते आणि कमी कर्बोदकयुक्त पदार्थांसाठी जागा सोडून वजन कमी करण्यासाठी ओळखले जाते. स्मरणशक्तीसाठी सात्विक आहारात अश्वगंधा, ब्राह्मीसारख्या फायदेशीर औषधींचं सेवन देखील समाविष्ट आहे. या औषधी वनस्पती स्मरणशक्ती वाढवतात, संज्ञानात्मक कार्य करतात आणि विकृत रोगांना प्रतिबंधित करतात. सात्विक आहार मेंदूला निरोगी ठेवतो आणि त्याचे कार्य सुधारित करतो. रोगांचा धोका कमी होतो myupchar.comचे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की संपूर्ण धान्य आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्याने मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग अशा दीर्घकालीन रोगांचा धोका कमी होतो. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख आरोग्यदायी आहार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
  First published: