वाचा - शरीरावरील एका छोट्याशा तिळाने वाचवला मॉडेलचा जीव; भयंकर आजाराचं वेळीच झालं निदान
सँडविच अनेकांना बाहेर तयार केलेली सँडविचेस (Sandwiches) खूप आवडतात. त्यात खूप वैविध्यही असतं; पण त्यात वापरलेला ब्रेड ताजा आहे की शिळा याची आपल्याला कल्पना नसते. तसंच वापरलेल्या भाज्याही चांगल्या, धुऊन, निवडून घेतल्या आहेत की नाही, याची खातरजमा आपण करू शकत नाही. त्यामुळे वरचेवर हे खाणं टाळणंच उत्तम. नाही तर जंतुसंसर्ग होऊन पोट बिघडू शकतं. पॅटिस रस्त्यावर बहुतेक वेळा स्वस्तात मिळणारं आलू पॅटिस, चिकन पॅटिस खाऊन अनेक जण दिवस काढतात. त्यात वापरलेला मसाला, भाजी, चिकन वगैरे काही कालावधीनंतर खराब व्हायला लागतं. उन्हाळ्यात तर काही तासांतच त्यांना वास येऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ खाऊ नयेत. ज्यूस उन्हाळ्यात किंवा दुपारच्या वेळी कामानिमित्त बाहेर फिरणाऱ्या व्यक्ती हेल्दी म्हणून ज्यूसवर (Juice) भर देतात; पण त्यातली फळं ताजी (Fresh Fruits) व कीड नसलेली, चांगली आहेत का हे कधी तपासलं आहे का? कारण ही फळं ताजी नसतील, तर त्यातून शरीराला काहीच पोषणमूल्यं मिळणार नाहीत. तसंच ही सरबतं, ज्यूसेस आधीपासून तयार करून ठेवली आहेत, की ग्राहकाने मागितल्यावर केली आहेत, याचीही खात्री करून घ्यायला हवी. कारण ज्यूस नेहमी ताजाच प्यावा. अन्यथा पोटात गॅसेस होणं, पोट बिघडणं अशा तक्रारी सुरू होतात. तसंच ज्यूस पिताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात वापरलेलं पाणी आणि बर्फ. त्याचाही दर्जा चांगला आहे ना, हे पाहिलं पाहिजे. नाही तर कॉलरा, काविळ यांसारखे आजार पसरू शकतात. एकंदरीत दुपारच्या वेळी बाहेरचे, शरीराला चांगले नसलेले अन्नपदार्थ खाण्यापेक्षा घरून डबा नेणं शक्य असेल, तर तो उत्तम पर्याय ठरेल. अथवा घरगुती खानावळींसारखे पर्याय योग्य ठरू शकतील.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health Tips