मुंबई, 8 डिसेंबर : बरेच लोक त्वचेवरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी बॉडी वॅक्स करवून घेणे पसंत करतात. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी थ्रेडिंग आणि फेस वॅक्सचा वापर केला जातो. फेस व्हॅक्सदेखील बॉडी व्हॅक्स सारखेच दिसते. पण तुम्हाला माहित आहे का? फेस व्हॅक्स हे शरीराच्या इतर भागांच्या व्हॅक्सपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. त्यामुळे फेस व्हॅक्स घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
वास्तविक चेहऱ्यावर व्हॅक्स लावणे हा थोडा धोकादायक उपचार ठरू शकतो. फेस व्हॅक्स करताना झालेली छोटीशी चूकही तुमच्या चेहऱ्यावर इरिटेशन, खाज, लालसरपणा आणि पुरळांचे कारण बनू शकते. त्यामुळे बॉडी व्हॅक्सऐवजी चेहऱ्यावर व्हॅक्सिंग करताना काही खबरदारी घ्यायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया फेस व्हॅक्स करण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स.
सतत मेकअप करणं पडू शकतं महागात; ब्युटी प्रॉडक्ट्सच्या अतिवापराचे 'हे' आहेत गंभीर परिणाम
घरी व्हॅक्सिंग टाळा
तुम्ही प्रोफेशनल ब्युटिशियन नसल्यास घरी व्हॅक्सिंग केल्याने तुमच्या स्किनवर त्वचेचा संसर्ग आणि पुरळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो घरी फेस व्हॅक्स करू नका. तसेच तुम्ही फेस व्हॅक्स करण्यासाठी एखाद्या व्यावसायिकाची मदत घेऊ शकता. यामुळे चेहऱ्यावर व्हॅक्सचे दुष्परिणाम होण्याचा धोका तुम्हाला राहणार नाही.
त्वचेच्या प्रकार लक्षात द्या
फेस व्हॅक्स घेताना तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घ्या. जास्त संवेदनशील आणि सैल त्वचेवर फेस वॅक्स अजिबात करू नका. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पुरळ आणि लालसरपणाची समस्या दिसू शकते.
चेहऱ्यावर आयसिंग
चेहऱ्यावर व्हॅक्स केल्यानंतर त्वचेची छिद्रे अनेकदा उघडतात. अशा परिस्थितीत त्वचेची उघडी छिद्रे बंद करण्यासाठी तुम्ही फेस आयसिंगचा वापर करू शकता. तसेच आयसिंग केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि अँटी रॅश लोशन वापरा.
फेशियल टाळा
व्हॅक्स केल्यानंतर चेहऱ्यावर कोणतेही सौंदर्य उपचार वापरणे टाळावे. कारण व्हॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्याची त्वचा खूप संवेदनशील होते. त्यामुळे फेस व्हॅक्स केल्यानंतर सुमारे दोन दिवस फेशियल किंवा स्क्रब करू नये. तसेच फेस व्हॅक्स केल्यानंतर ब्लीचदेखील आठवडाभर टाळावे.
Winter Health Tips : हिवाळ्यात त्वचेची चमक आणि आरोग्य दोन्हीही राहील कायम; फक्त या तेलाने करा मसाज
या गोष्टींची काळजी घ्या
फेस व्हॅक्स लावण्यापूर्वी चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे सौंदर्य उत्पादन वापरू नका. तसेच फेस व्हॅक्स करताना, चेहरा पूर्णपणे धुवा आणि कोरडा करा आणि व्हॅक्स करण्यापूर्वी चेहऱ्यावर फेशियल करणे टाळा. याशिवाय फेस वॅक्स करताना केस विरुद्ध दिशेने ओढून जास्त वेगाने काढू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Health, Health Tips, Lifestyle, Skin