मुंबई, 9 फेब्रुवारी : सध्याच्या व्यस्त जीवनशैलीचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लोक तणाव आणि चिंतेला बळी पडत आहेत. बर्याच वेळा लोक पॅनिक अटॅक आणि एन्गझायटी अटॅकच्या विळख्यातही येतात. या दोन्ही अशा परिस्थिती आहेत, जेव्हा लोक हृदय गती वाढण्याची भीती बाळगतात. काही लोकांना असे वाटते की ही बाब हृदयविकाराशी संबंधित असू शकते, परंतु सहसा तसे नसते.
मनोचिकित्सकाच्या मदतीने पॅनिक आणि एन्गझायटी अटॅकवर उपचार केले जाऊ शकतात. मात्र सर्व प्रथम या दोघांमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. लोक हे दोन्ही अटॅक सारखेच मानतात, पण तसे नाही. दोघांमध्ये मोठा फरक आहे. मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, पॅनिक आणि एन्गझायटी अटॅकचे कारण स्पष्ट झालेले नाही. हे दोन्ही विकार आनुवंशिक, वैद्यकीय आणि बाह्य कारणांमुळे होऊ शकतात.
कोलेस्टेरॉल वाढल्यास दिसत नाहीत लक्षणं! फक्त या पद्धतीनेच ओळखू शकता
सामान्यतः पॅनिक आणि एन्गझायटी अटॅकचे कारण जास्त ताण, अल्कोहोल आणि ड्रग्सचे सेवन, तीव्र वेदना, औषधांचे दुष्परिणाम, फोबियास, आघात, कॅफीनचे अतिसेवन हे कारण असू शकते. जरी वेगवेगळ्या लोकांना ही समस्या वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते. हे टाळण्यासाठी लोकांनी मानसोपचार तज्ज्ञांना भेटावे.
ही 3 लक्षणे आहेत सामान्य
पॅनिक आणि एन्गझायटी अटॅकची काही लक्षणेदेखील सारखीच आहेत. यामध्ये हृदय गती वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि भीती वाटणे हे महत्त्वाचे आहे. ही सर्व लक्षणे फार कमी प्रकरणांमध्ये गंभीर असतात. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, पॅनिक आणि एन्गझायटी अटॅक हे विकार मानले जातात, परंतु ते वैद्यकीयदृष्ट्या परिभाषित केलेले नाहीत. डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य व्यावसायिक लक्षणांवर आधारित रुग्णांवर उपचार करतात.
पॅनिक आणि एन्गझायटी अटॅकमधील मुख्य फरक
- पॅनिक अटॅक कोणत्याही कारणाशिवाय होऊ शकतो. अत्यंत तणाव किंवा धोक्याची प्रतिक्रिया म्हणून एन्गझायटी अटॅक होतो.
- पॅनिक अटॅक अचानक होतात, तर एन्गझायटी अटॅक हळूहळू विकसित होतात आणि नंतर दिसतात. ते अचानक घडत नाही.
- पॅनिक अटॅकमध्ये तुम्ही खूप अस्वस्थ होऊ शकता आणि एकाकीपणाची भावना निर्माण होते. एन्गझायटी अटॅकची लक्षणे कधी कमी, कधी जास्त असतात.
- पॅनिक अटॅक 5-20 मिनिटांत बरा होत. तर एन्गझायटी अटॅक अनेक तास किंवा अनेक दिवस टिकू शकतो.
कॅन्सर झाल्यास पुरुषांमध्ये दिसतात ही लक्षणं, या छोट्या त्रासांकडेही करू नका दुर्लक्ष
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle