Menopause Period : कसा असावा रजोनिवृत्तीतील आहार?

Menopause Period : कसा असावा रजोनिवृत्तीतील आहार?

During Menopause What To Eat And What to Avoid - मेनोपॉजच्या काळात (During menopause) जास्त त्रास होऊ नये यासाठी डाएटकडे जास्त लक्ष द्यायला हवं.

  • Share this:

मुंबई, 09 मे : साधारणपणे महिलांचा मेनोपॉज (Menopause) म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ 45 ते 50 वर्ष मानला गेला आहे. याच काळात महिलांच्या शरीरात हार्मोनल चेंजेस होतात. महिलांना पीरियड म्हणजे मासिक पाळी येणं कायमचं बंद होतं. महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होत असल्याने (Due to change in hormones) त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

रजोनिवृत्तीच्या कालावधीत महिलांमध्ये चिडचिडेपणा, थकवा, मूड स्विंग्स, शरीतात उष्णता वाढणे, घाम येणं, ऑस्टियोपोरोसिस, स्थूलपणा आणि डायबेटीजसारखे अनेक त्रास व्हायला लागतात. त्यामुळेच अशा काळात महिलांनी आपल्या डाएटकडे विशेष लक्ष द्यायला हवं. (diet during menopause).

जाणून घेऊयात या काळात आहार कसा असावा.

फायबर रिच फूड - आपल्या डाएटमध्ये फायबर रिच फूडचा समावेश करा. ज्वारी, बाजरी, नाचणी, हिरव्या भाज्या आणि फळं असू द्यात.

प्रोटीनयुक्त फूड - प्रोटीनयुक्त पदार्थ खा. फळं, दूध, दही, डाळ, पनीर, अंडी आणि चिकन अशा वस्तूंचा आपल्या डाइटमध्ये समावेश करा.

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी - आपल्या डाइटमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी देणार पदार्थ असू द्यात. यासाठी सोया फूड, दूध, दही, पनीर, अंडी, मशरूम, साल्मन मासा आपल्या जेवणात असू द्या.

(कोरोनामध्ये माणुसकीचं दर्शन घडवतोय हा तरुण; दररोज 100 कोरोनाग्रस्तांना मोफत जेवण)

फाइटोएस्ट्रोजेनिक फूड - आपल्या डाइटमध्ये फायटोएस्ट्रोजेनिक फूडदेखील असणं आवश्यक आहे. अळशी, तीळ, टोफू, बीन्स आणि सोयाबीन यांना फायटोएस्ट्रोजेनिक फूड म्हणतात.

हिरव्या पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्यासुद्धा मोनोपॉजच्या काळात खायला हव्यात. पालक, कोबी, मेथी, राई, चवळी या हिरव्या पालेभाज्या खायला हव्यात.

फळं - संत्री, मोसंबी, द्राक्ष, टरबूज, खरबूज, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि नारळ पाणी यांचा सामवेश आहारात करू शकता. या फळांनी शरीरात पाण्याच्या मात्र वाढेल. शरीर हायड्रेट राहिल.

(कोरोना कधी जाणारच नाही का? स्टडीतून मोठा खुलासा, आणखी वाढणार चिंता!)

कोणते पदार्थ टाळाल

सोडियमयुक्त पदार्थ - या काळात सोडियमयुक्त पदार्थ खाऊ नका. सॉस, केचअप, पापड, लोणचं, मीठ, न्युडल्स, पॅक्ड ज्युस, पॅक्ड भाज्या, सी फूड, सोया सॉस, प्रोसेस्ड चीज, प्रिझर्व्हेटिव्ह फूड आणि ओवा खाऊ नये.

कॅफीनयुक्त पदार्थ -  मोनोपॉजच्या काळात कॉफिनयुक्त पदार्थ घेऊ नका. डिकॅफीनेटेड कॉफी, कोकोआ वापरून बनणारे पदार्थ, चॉकलेट मिल्क एनर्जी ड्रिंक, चहा, कॉफी, एस्प्रेसो आणि सॉफ्ट ड्रिंक या गोष्टी टाळा.

Published by: News18 Desk
First published: May 9, 2021, 8:33 AM IST

ताज्या बातम्या