डाएट समज-गैरसमज : वजन कमी करायचं असेल तर जेवणार हा एक पदार्थ हवाच

डाएट समज-गैरसमज : वजन कमी करायचं असेल तर जेवणार हा एक पदार्थ हवाच

वजन कमी करायचं असेल तेल-तूप बंद करा, तळलेलं खाऊ नका असं आवर्जून सांगितलं जातं. पण हे पदार्थ बंदच करायचे का? एका संशोधननानुसार वजन कमी करायचं असेल तर उलट तूप खायला पाहिजे.

  • Share this:

वजन कमी करायचं असेल तेल-तूप बंद करा, तळलेलं खाऊ नका असं आवर्जून सांगितलं जातं. या एका बाबतीत डाएटवाल्या सगळ्यांचं एकमत असतं. पण तूप खाल्ल्याने वजन कमी होतं असं सांगितलं तर? पण यात तथ्य आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर साजूक तूप किंवा देशी घी खायलाच पाहिजे. एका संशोधनानुसार गाईच्या दुधापासून बनवलेलं शुद्ध घरगुती तूप आपलं आरोग्य सुधारतं आणि त्यापासून आपल्या शरीरातील चरबी  वाढत नाही.

या संशोधनानुसार, तुपात इसेन्शिअल अमिनो अॅसिड्स असतात. ते शरीरातील चरबीचे घटक कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये तुपाचा समावेश करावाच लागेल.

तुपात  असलेल्या याच अॅमिनो अॅसिडमुळे पचनक्रिया सुद्धा सुधारते. अॅसिडिटी, ब्लोटिंग असा त्रासही तुपामुळे कमी होतो. शरीराला सूज असेल तर त्यावरही उपाय म्हणून तुपाचं सेवन करण्यास सांगितलं जातं. वजन कमी करण्याच्या व्यतिरिक्त तुपामधील व्हिटॅमिन्समुळे प्रतिकारशक्ती सुधारते आणि आजारांना बळी पडत नाही.

वाढत्या वयात तुपाच्या सेवनाने संधीवातासारखे आजार  कमी होतात. तुपात फॅट्स असतात. पण ते चांगले फॅट्स असतात. वाईट कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवण्यास ते मदत करतात. या फॅट्सचा उपयोग शरीरातील एनर्जी वाढवण्यासाठी होतो.

निरोगी राहायचं असेल तर जेवणात तूप हवंच. आपल्याकडे मराठमोळ्या जेवणात वरणभात आणि त्यावर साजूक तूप असतं. ते आदर्श ताट मानलं जातं. तुपामुळे स्मरणशक्तीही चांगली होते. अनेकदा निरोगी राहण्यासाठी घरात विशेषत: जेवणात बरेच पदार्थ असतात. पण अज्ञानामुळे किंवा गैरसमजुतीमुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.  शिवाय फास्ट फूडच्या नादात तर आरोग्याची हेळसांड होते.

------------------------------------

हेही वाचा

बस लुटण्यासाठी चढला आणि बंदुक पॅन्टमध्येच अडकली, सुटली ना गोळी!

चौथ्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर आली चिमुकली, श्वास रोखून पाहा VIDEO

ही महिला दिवसाला खाते 200 ग्राम बेबी पावडर, 15 वर्षात पावडरसाठी खर्च केले...!

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: January 9, 2020, 7:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading