मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /नाईट शिफ्ट करताना डोकेदुखी, अपचनाच्या समस्या उद्भवतात? मग हे खास डायट फॉलो करा

नाईट शिफ्ट करताना डोकेदुखी, अपचनाच्या समस्या उद्भवतात? मग हे खास डायट फॉलो करा

नाईट शिफ्ट करताना डोकेदुखी, अपचनाच्या समस्या उद्भवतात? मग हे खास डायट फॉलो करा

नाईट शिफ्ट करताना डोकेदुखी, अपचनाच्या समस्या उद्भवतात? मग हे खास डायट फॉलो करा

नोकरीत अनेकदा नाईट शिफ्ट केल्यामुळे आरोग्याच्या समस्या जाणवतात. तेव्हा या दरम्यान शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून काही खास डायट फॉलो करा.

  मुंबई, 26 मे : आपल्या शरीराची रचना अशी आहे की, आपण दिवसभर काम करतो आणि रात्री आराम करतो. खरं तर प्रत्येक व्यक्तीने शरीराच्या याच रिदमनुसार काम केलं पाहिजे. त्यामुळे रात्री पुरेशी विश्रांती घेऊन सकाळी लवकर उठायला हवं. पण नोकरी करणाऱ्यांसाठी हे तितकं सोपं नाही. कारण, काही प्रोफेशनमध्ये नाईट शिफ्ट करावी लागते. नाईट शिफ्ट केल्याने त्याचे शारीरिक आणि मानसिक परिणाम होतात. योग्य आहाराच्या मदतीने हे दुष्परिणाम कसे टाळता येतील, याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या मते, नाईट शिफ्टमध्ये काम केल्याने पचन, मेटाबॉलिजम, हॉर्मोन्स आणि मानसिक आरोग्य बिघडते. पण ज्यांना नाईट शिफ्ट करण्याशिवाय पर्याय नाही, त्यांनी या काळात योग्य आहार घेतल्याने नुकसान कमी करता येऊ शकतं. अनेक संशोधनांनुसार, नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना लठ्ठपणा, हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका जास्त असतो.

  नाईट शिफ्ट करणाऱ्यांनी हा डायट प्लॅन फॉलो करा :

  ऑफिसला निघण्यापूर्वी 'हे' खा :

  नाईट शिफ्टवर जाण्यापूर्वी धान्य किंवा मिलेटपासून बनलेले पदार्थ खावे. उन्हाळ्यात तुम्ही राजगिरा, ज्वारी किंवा नाचणीची भाकरी आणि दलिया खाऊ शकता. यामुळे नाईट शिफ्टमध्ये सारखी लागणारी भूक लागत नाही आणि खाण्याचं क्रेव्हिंगही होत नाही.

  ऑफिसला पोहोचल्यावर 'ही' ड्रिंक्स प्या :

  ऑफिसमध्ये पोहोचताच चहा-कॉफी घेऊन शिफ्ट सुरू करू नका. त्याऐवजी तुम्ही पाणी, ताक किंवा बडिशेप सरबत पिऊ शकता. जेणेकरून शिफ्ट संपेपर्यंत डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ किंवा चिडचिड अशी कोणतीही समस्या तुम्हाला उद्भवणार नाही.

  नाईट शिफ्टवरून घरी आल्यावर काय खायला हवं? :

  नाईट शिफ्टवरून घरी परतल्यावर केळी, आंबा किंवा गुलकंद दूध आणि इत्यादी गोष्टी खाव्यात.  यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही आणि तुमची झोप पूर्ण होईल. झोपेतून उठल्यानंतर 3 सूर्यनमस्कार घाला आणि नंतरच पुढच्या नाईट शिफ्टसाठी जा. म्हणजे तुम्ही पुरेसे वॉर्म अप झालेले असाल.

  नाईट शिफ्टसाठी इतर हेल्थ टिप्स :

  1. शिफ्ट सुरू असताना कमी खा.

  2. शिफ्टवर जाण्याआधी किमान अर्धा तासाची झोप घ्या.

  3. शिफ्टमध्ये काम करत असताना भरपूर पाणी प्या.

  4. नाईट शिफ्ट करणाऱ्यांनी आपली झोप पूर्ण करा.

  वर दिलेल्या टिप्स फॉलो केल्याने नाईट शिफ्टमध्ये होणारा अपचन, डोकेदुखी किंवा मळमळ इत्यादी त्रास होणार नाही. तुम्हाला शिफ्टमध्ये काम करताना फ्रेश वाटेल आणि शारीरिक दुष्परिणामही कमी होतील.

  First published:
  top videos

   Tags: Health, Health Tips, Lifestyle