मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

ऐकावे ते नवलच! या बेटावरील माती लोक मसाल्याप्रमाणे खातात

ऐकावे ते नवलच! या बेटावरील माती लोक मसाल्याप्रमाणे खातात

हे जगातलं असं एकमात्र बेट आहे, की जिथल्या पर्वतांवरची माती खाण्यायोग्य आहे आणि ती चाखण्याचा सल्ला तिथले गाइड्स देतात.

हे जगातलं असं एकमात्र बेट आहे, की जिथल्या पर्वतांवरची माती खाण्यायोग्य आहे आणि ती चाखण्याचा सल्ला तिथले गाइड्स देतात.

हे जगातलं असं एकमात्र बेट आहे, की जिथल्या पर्वतांवरची माती खाण्यायोग्य आहे आणि ती चाखण्याचा सल्ला तिथले गाइड्स देतात.

मुंबई, 22 ऑक्टोबर : जगभरातली अनेक ठिकाणं निसर्गसौंदर्यासाठी ओळखली जातात. त्यामुळे ती पर्यटनासाठी उत्त्कृष्ट असतात. अशी बहुतांश स्थळं पर्यटकांना माहिती असली, तरी अनेकांना माहिती नसलेली सुंदर पर्यटनस्थळंही खूप आहेत. यातच इराणमधल्या (Iran) होर्मुझ बेटाचाही (Hormuz Island) समावेश होतो. हे बेट म्हणजे अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळ असून, ते इंद्रधनुषी बेट अर्थात रेन्बो आयलंड (Rainbow Island) म्हणूनही ओळखलं जातं. या बेटावर रंगीबेरंगी पर्वत आहेत. म्हणून त्याला तसं नाव आहे. पर्शियन गल्फमध्ये (Persian Gulf) असलेल्या या रहस्यमयी बेटावरच्या पर्वतांसोबतच सागरकिनारेही वेगळ्या छटेची उधळण करतात. या बेटावरची माती मसालेदार असते. हे बेट निसर्गसौंदर्यासाठी ओळखलं जातंच; पण तिथे मिळणाऱ्या खनिज संपत्तीसाठीही ओळखलं जातं. भूगर्भशास्त्रज्ञांचं डिस्नेलँड असंही या बेटाला म्हटलं जातं. तिथले टुरिस्ट गाइड तिथल्या मातीची चव घ्यायचा सल्ला देतात. या बेटावर अनेक ठिकाणी मिठाचे (Salt) छोटे डोंगर दिसतात. त्यात शेल, माती आणि लोहसमृद्ध अग्निज खडकांचे थर दिसतात. या रंगीत दगडांच्या थरांमुळेच या बेटावर अनेक ठिकाणी पिवळा, लाल आणि नारंगी रंग चमकताना दिसतो. दंश करून शेजारीच लपला कोब्रा, नाग पकडण्यासाठी आली JCB; पाहा VIDEO असं सांगितलं जातं, की या बेटावर 70 प्रकारची खनिजं (Minerals) सापडतात. तिथले गाइड सांगतात, त्यानुसार त्या 42 वर्ग किलोमीटरच्या क्षेत्रातल्या प्रत्येक इंच जमिनीची स्वतःची अशी कहाणी आहे. ब्रिटिश जिऑलॉजिकल सर्व्हेच्या प्रमुख भू-वैज्ञानिक डॉ. कॅथरीन गुडइनफ पूर्वी इराणमध्ये कार्यरत होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोट्यवधी वर्षांपूर्वी पर्शियन गल्फ आणि आजूबाजूच्या समुद्रात मिठाचे मोठे थर तयार झाले. हे थर एकमेकांवर आपटत गेले आणि तिथल्या खनिजसमृद्ध ज्वालामुखीच्या धुळीचे थरही त्या मिसळले गेले. त्यामुळे तिथला भूभाग रंगीबेरंगी बनला. ज्वालामुखीतून बाहेर आलेल्या मिश्रणामुळे आधी मिठाचे थर झाकले गेले. कालांतराने भेगांमधून मीठ वर येत गेलं आणि मिठाचे छोटे डोंगर बनले. मिठाचे मोठे थर जमिनीच्या खाली कित्येक किलोमीटरपर्यंत आहेत आणि पर्शियन गल्फच्या मोठ्या क्षेत्रात पसरलेले आहेत, असं गुडइनफ म्हणतात. तिथल्या भूभागावर सुंदर किनारे, डोंगर आणि गुहा आदींचा संगम आहे. म्हणूनच या बेटाला रेन्बो आयलंड असं म्हटलं जातं. हे जगातलं असं एकमात्र बेट आहे, की जिथल्या पर्वतांवरची माती खाण्यायोग्य आहे आणि ती चाखण्याचा सल्ला तिथले गाइड्स देतात. आवडता शर्ट घातला नाही म्हणून पत्नी रागावली; पतीला आला तिच्या मृत्यूचा कॉल तिथल्या अनेक ठिकाणच्या मातीचा उपयोग मसाल्यांसारखाही केला जातो. तिथल्या काही पर्वतांवर गिलॅक नावाची माती आढळते. ती हिमॅटाइट या लोहयुक्त घटकापासून बनलेली आहे. ती माती अग्निज खडकांपासून तयार झाल्याचं सांगितलं जातं. गिलॅकचा उपयोग उद्योगधंद्यांसोबतच स्थानिक भोजनात मसाल्याप्रमाणे केला जातो. हा मसाला तिथले स्थानिक नागरिक ब्रेडसोबतही खातात. तिथले स्थानिक नागरिक सांगतात, की तिथली लाल माती सॉसप्रमाणेही वापरली जाते. त्या सॉसला सूरखा असं म्हटलं जातं. त्याशिवाय पेंटिंग, कॉस्मेटिक्स, सिरॅमिक आदींमध्येही या लाल मातीचा उपयोग केला जातो. माणिकलाल पर्वताखेरीज होर्मुझच्या पश्चिमेला मिठाचाही एक डोंगर आहे. त्या मिठात औषधी गुणधर्मही आहेत, असं मानलं जातं. एवढी वैशिष्ट्यं असूनही हे बेट जगातल्या फारच थोड्या लोकांना माहिती आहे. 2019 साली तिथे केवळ 1800 पर्यटकांनी भेट दिली होती. तिथले स्थानिक नागरिक तिथल्या पर्यटनाच्या (Tourism) सुविधा वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या क्षेत्राला जागतिक पातळीवर ओळख मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
First published:

Tags: Iran

पुढील बातम्या