मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हाला माहिती आहे का? हाय ब्लडप्रेशरमुळे जाऊ शकते दृष्टी, डोळ्यांवर होतो असा परिणाम

तुम्हाला माहिती आहे का? हाय ब्लडप्रेशरमुळे जाऊ शकते दृष्टी, डोळ्यांवर होतो असा परिणाम

वाढलेले ब्लड प्रेशर रेटिनल रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवू शकते. हाय ब्लडप्रेशरमुळे डोळ्यांचे विविध आजार (High Blood Pressure Effect On Eyes) होऊ शकतात. वाढत्या बीपीमुळे डोळ्यांच्या कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात याची सविस्तर माहिती घेऊया.

पुढे वाचा ...
  मुंबई, 08 जुलै : सध्याच्या धावत्या आणि सतत बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे आपले आरोग्य जपणे थोडे अवघड झाले आहे. नवीन येणाऱ्या आजारांसोबत पूर्वीच्या आजारांचा धोकाही आहेच. हल्ली कामातील वाढत्या स्पर्धेमुळे ताणतणाव निर्माण होणं अगदीच सामान्य झालाय. मात्र त्याचा परिणाम म्हणून माणसाला अनेक आजार जडतात. रीरातील अवयवांवर परिणाम होतो. यातीलच एक आजार म्हणजे हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure). हाय ब्लडप्रेशरमुळे (High Blood Pressure Effects) हृदय, मूत्रपिंड आणि इतर अवयवांवर परिणाम होतो. तुम्हाला माहिती आहे का की, हाय ब्लडप्रेशरचा आपल्या डोळ्यांवरदेखील परिणाम होऊ शकतो? वाढलेले ब्लडप्रेशर रेटिनल रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवू शकते. यामुळे डोळ्यांचे विविध आजार (Eye Diseases) होऊ शकतात. हाय ब्लडप्रेशरमुळे उद्भवणाऱ्या डोळ्यांच्या समस्या (High Blood Pressure Effect On Eyes) हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी (Hypertensive Retinopathy) ज्या व्यक्तींना जास्त काळ हाय ब्लडप्रेशरची समस्या असते. त्यांना हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीची समस्या जाणवू शकते. या रोगामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे रेटिनाला सूज येते. शिवाय, डोळ्यांतील रक्तवाहिन्या मोठ्या होतात, ज्यामुळे आपल्या दृष्टीवर त्याचा वाईट परिणाम होतो.

  Health Tips : वजन कमी करायचंय आणि Heart Attack ची भीती पण नकोय? यावर लसणाचा चहा आहे सर्वोत्तम उपाय

  डोळ्यात रक्ताचे स्पॉट (Blood Spots In Eyes) हाय ब्लडप्रेशरमुळे आपल्या डोळ्यांमध्ये रक्ताचे स्पॉटदेखील दिसू शकतात. वृद्ध लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसते. ज्याला सबकंडक्टिव हेमरेज असे म्हणतात. हा रोग हाय ब्लडप्रेशर दर्शवतो. रक्तातील साखरेची पातळी वाढणे आणि हाय ब्लडप्रेशरच्या समस्येमध्ये हे लक्षण दिसून येते. जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल तर ते कमकुवत डोळ्यांचे एक सामान्य लक्षण आहे.

  केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही वरदान आहे 'हे' फळ, फायदे वाचून थक्क व्हाल!

  दृष्टी कमी होणे (Vision Loss) हाय ब्लडप्रेशरमुळे आपली दृष्टी कमी होते. ब्लडप्रेशर वाढल्याने मेंदूतील दाब वाढतो, ज्यामुळे मेंदूतील नसांवर दबाव पडतो. हा दाब इतका जास्त असतो की आपल्या डोळयातील पडद्यावर कोणतीही आकृती तयार होत नाही आणि रुग्णाला काहीही दिसत नाही. त्यामुळे जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशरची समस्या असेल तर तुम्ही नेत्र तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Eyes damage, Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या