• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी फक्त इतकी काळजी घ्या; मग दिवाळी होईल आनंदात साजरी

Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी फक्त इतकी काळजी घ्या; मग दिवाळी होईल आनंदात साजरी

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे गरजेचे असून थोडासा निष्काळजीपणा मोठा त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे या सणासुदीत मधुमेहाच्या रुग्णांनी काही गोष्टींची विशेष काळजी (diabetic and Diwali) घ्यावी.

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : सणासुदीच्या काळात लोक आरोग्याची अजिबात काळजी घेत नाहीत. धनत्रयोदशी, दिवाळीपासून भाऊबीजेपर्यंत घरात मिठाईचा ढीग लागत जातो आणि मग कसलीही पर्वा न करता खाण्यावर भर दिला जातो. थंडीच्या मोसमात आपली पचनक्रियाही मंद राहते, ज्यामुळे शरीराला या गोष्टी सहज पचत नाहीत. सण-उत्सवादरम्यान मधुमेहाचा (diabetic patient) त्रास असलेल्या लोकांनी सर्वाधिक काळजी घेणं आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे गरजेचे असून थोडासा निष्काळजीपणा मोठा त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे या सणासुदीत मधुमेहाच्या रुग्णांनी काही गोष्टींची विशेष काळजी (diabetic and Diwali) घ्यावी. 1. सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी एकदा रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासावी. शरीर तपासणी करून घेतल्याने तुम्हाला संभाव्य धोक्यांची जाणीव होईल आणि तुम्ही सावधगिरीने सणांचा आनंद घ्याल. 2. सणासुदीच्या काळात गोड पदार्थ किंवा गोड पेय या दोन्हींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान तुम्ही तळलेले अन्न खाणं देखील टाळावं. खाण्या-पिण्याच्या दिनचर्येचीही काळजी घ्या. घरचे अन्न खा. जर तुम्ही बाहेर कुठेतरी रात्रीचे जेवण करण्याचा विचार करत असाल तर रिफाइंड साखर आणि सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाऊ नका. हे वाचा - उजनीत आढळला टोकदार दातांचा विदेशी मासा; जीव तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती 3. या काळात घरातील सदस्यांनीही मधुमेही रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. रुग्ण किंवा घरच्यांनी तोंडावाटे दिलेली मधुमेहविरोधी औषधे आणि इन्सुलिनशी संबंधित समस्या डॉक्टरांना विचारल्या पाहिजेत जेणेकरून रुग्णाच्या आरोग्याला फारसा त्रास होणार नाही. हे वाचा - या 6 गोष्टी लक्षात ठेवून दिवाळीत करा Smart Shopping, फसव्या ऑफर्स आणि कर्जापासून राहाल दूर 4. दिवाळी आणि भाऊबीज यासारख्या सणांना मिठाई आणि गोड पदार्थांचा भरपूर आस्वाद घेतला जातो. पण मधुमेही रुग्णांनी अशा गोष्टींपासून दूर राहिले तर बरे होईल. गोड पदार्थ किंवा मिठाईऐवजी, तुम्ही गूळ, खजूर किंवा अंजीर यासारखे स्वादिष्ट पर्याय शोधू शकता. 5. सणासुदीला मिठाईशिवाय इतरही अनेक आरोग्यदायी गोष्टी घरात येतात. डायबिटीजमध्ये तुम्ही फायदेशीर फळे किंवा ड्रायफ्रुट्सचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता. जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर ही दिनचर्या खंडित होऊ देऊ नका.
  Published by:News18 Desk
  First published: