मुंबई, 24 जानेवारी : मधुमेह हा संपूर्ण जगासाठी धोकादायक आजार बनत चालला आहे. मधुमेहामुळे मूत्रपिंड, यकृत, हृदय आणि डोळ्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात 422 दशलक्षाहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. यासोबतच दरवर्षी 15 लाख लोकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मधुमेहामुळे मृत्यू होतो.
पण एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, मधुमेह मुळापासून नष्ट केला जाऊ शकतो. मात्र यासाठी जीवनशैली आरोग्यदायी बनवावी लागेल. आता एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, हिवाळ्यात पोहल्यामुळे रक्तातील साखर पूर्णपणे कमी होऊ शकते.
सकाळी ब्रश न करता पाण्यात मिसळून प्या ही 5 पानं, रक्तातील साखर नेहमी राहील नियंत्रणात
मधुमेहावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे कारण भारतात सर्वाधिक 80 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. आकडेवारीनुसार, 2045 पर्यंत भारतात 13.5 कोटी लोक मधुमेही असतील. त्यामुळे भारताला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाऊ लागले. चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे मधुमेह होतो. म्हणूनच जर आपण आपल्या सवयी बदलून निरोगी जीवनशैलीचे पालन केले तर आपण मधुमेहापासून मुक्त होऊ शकतो.
संशोधन काय झाले
ग्लोबल डायबिटीज कम्युनिटीच्या वेबसाईटनुसार, नॉर्वेच्या आर्क्टिक युनिव्हर्सिटी आणि नॉर्थ नॉर्वेच्या हॉस्पिटलच्या संशोधकांनी या संदर्भात एक अभ्यास केला आहे. अभ्यासात असे आढळून आले की, बाहेरच्या थंड पाण्यात अंघोळ केल्याने शरीरातील वाईट चरबी बाहेर पडते. वाईट चरबी कमी झाल्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढू लागते आणि मधुमेह दूर होऊ शकतो. अभ्यासात शंभरहून अधिक संशोधने तपासण्यात आली, ज्याच्या आधारे असे म्हटले गेले आहे की थंड पाण्यात पोहणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे हृदयविकार आणि लठ्ठपणाला आळा बसतो आणि शेवटी मधुमेहाचा धोका पूर्णपणे कमी होतो.
थंड पाण्यात पोहण्याचे इतर अनेक फायदे
प्रमुख संशोधक जेम्स मर्सर यांनी सांगितले की, आता हे वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट झाले आहे की, थंड पाण्यात पोहल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. याचे केवळ शारीरिक फायदेच नाही तर मानसिक फायदेही होतात. थंड पाण्यात पोहल्याने तणाव कमी होण्यास आणि सामाजिक संवाद वाढण्यास मदत होते. यातून सकारात्मक मानसिकता निर्माण होते.
हा त्रास होऊ लागला की समजून जा, जीवघेण्या पातळीवर पोहचलीये ब्लड शुगर
थंड पाण्यात पोहल्याने मानसिक आरोग्यालाही फायदा होतो आणि वजनही कमी होते. एका अभ्यासात असेही म्हटले आहे की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने लैंगिक उत्तेजना वाढते. आधीच्या एका अभ्यासात असे म्हटले होते की, थंड पाण्यात पोहल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव देखील कमी होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diabetes, Health, Health Tips, Lifestyle