मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लघवीचा 'हा' रंगही असू शकतो मधुमेहाचे लक्षण, दिसल्यास त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला

लघवीचा 'हा' रंगही असू शकतो मधुमेहाचे लक्षण, दिसल्यास त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला

मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे किडनीवर परिणाम होतो. किडनीमुळे शरीरातील हानिकारक पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढले जातात. म्हणूनच कोणत्याही आजाराच्या बाबतीत लघवीचा रंग बदलणे हे एक लक्षण असू शकते.

मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे किडनीवर परिणाम होतो. किडनीमुळे शरीरातील हानिकारक पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढले जातात. म्हणूनच कोणत्याही आजाराच्या बाबतीत लघवीचा रंग बदलणे हे एक लक्षण असू शकते.

मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे किडनीवर परिणाम होतो. किडनीमुळे शरीरातील हानिकारक पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढले जातात. म्हणूनच कोणत्याही आजाराच्या बाबतीत लघवीचा रंग बदलणे हे एक लक्षण असू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 फेब्रुवारी : मधुमेह हा अतिशय धोकादायक आजार आहे. यामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात 422 दशलक्षाहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. यासोबतच दरवर्षी 15 लाख लोकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मधुमेहामुळे मृत्यू होतो. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. कारण स्वादुपिंडात तयार होणारे इन्सुलिन तयार होत नाही किंवा बनवल्यावर परिणामकारक ठरत नाही.

इन्सुलिन स्वतः रक्तातील साखर शोषून घेते. जेव्हा इन्सुलिनची कमतरता असते तेव्हा रक्तामध्ये सर्वत्र साखर वाढू लागते आणि त्याचा परिणाम लघवीवरही होतो. मधुमेहाचे पहिले लक्षण बहुधा लघवीच्या रंगात दिसून येते. लघवीचा रंग इतरही अनेक आजारांचे संकेत देत असला, तरी इतरही काही चिन्हे असतील तर हे निश्चितपणे मधुमेहाचे लक्षण आहे. या परिस्थितीत, डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

Dry Fruit Benefits : सुक्या मेव्याचे मिळतील जास्तीत जास्त फायदे, फक्त अशा पद्धतीने नियमित खा

मधुमेहामध्ये लघवीचा रंग क्लाऊडी होतो

हेल्थलाइनच्या बातमीनुसार, मधुमेहामुळे लघवीचा रंग क्लाऊडी होतो. मधुमेह हा एक जुनाट आजार आहे. यामध्ये रक्तातील ग्लुकोज खूप जास्त होते आणि ते संपूर्ण शरीरात पसरू लागते कारण ग्लुकोज शोषून घेणारा इन्सुलिन हार्मोन तयार होत नाही किंवा काम करत नाही. एक प्रकारे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. ही साखर शेवटी लघवीद्वारे बाहेर पडते. मूत्रपिंड रक्त फिल्टर करते आणि लघवीद्वारे कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकते. परंतु अतिरिक्त साखर गाळण्यास असमर्थ ठरते. म्हणजे साखरेचे प्रमाणही लघवीत येते. यामुळेच लघवीचा रंग क्लाऊडी होतो.

मधुमेहाची इतर लक्षणे

हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, जेव्हा लघवीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, तेव्हा त्यातून ग्लुकोजसारखा वास येऊ लागतो. म्हणजेच त्याचा वास फळांसारखा येऊ लागतो आणि गोड वासही येऊ लागतो. काही लोकांमध्ये या लक्षणाच्या आधारे हे समजू शकते की त्याला मधुमेह आहे. त्यामुळे जर तुमच्या लघवीचा रंग क्लाऊडी किंवा गढूळ झाला असेल आणि त्याचा वास फळांसारखा असेल. तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

यासोबतच मधुमेहामुळे थकवा जाणवू लागतो. खूप भूक लागणे, लघवीही वारंवार येते, संसर्ग झाल्यास तो लवकर बरा होत नाही, तहानही खूप लागते, हात-पायांमध्येही मुंग्या येणे सुरू होते. त्यामुळे जर ही लक्षणे लघवीच्या रंगासोबत असतील तर नक्कीच तुम्हाला मधुमेह आहे.

Coffee Day : रोज या प्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीराला होतात अनेक फायदे, मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Tips for diabetes