इतक्या दिवसांमध्ये वजन कमी केलं तर डायबेटीसचा धोका होईल कमी

इतक्या दिवसांमध्ये वजन कमी केलं तर डायबेटीसचा धोका होईल कमी

हा आजार झाल्यास खाण्या- पिण्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. एवढंच नाही तर या आजाराकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर यामुळे जीवही जाऊ शकतो.

  • Share this:

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. यामुळे शरीरात इन्सुलिनचं हार्मोन तयार होणं कमी होतं. यामुळे लठ्ठपणा आणि तणाव यांसारखे गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं. हा एक अनुवंशिक रोग आहे. हा आजार झाल्यास खाण्या- पिण्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. एवढंच नाही तर या आजाराकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर यामुळे जीवही जाऊ शकतो.

नुकत्याच झालेल्या शोधात एक नवीन गोष्ट समोर आली ती म्हणजे ज्या व्यक्तीला मधुमेह (टाइम 2) झाल्याचे कळते तेव्हापासून पुढच्या पाच वर्षांच्या आत एकूण वजनाच्या 10 टक्के किंवा त्याहून वजन कमी केलं तर मधुमेह ठीक होण्याची शक्यता जास्त असते.

या शोधात हेही सांगण्यात आले आहे की, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये फार मोठे बदल करण्याचीही गरज नाही. डायबेटिक मेडिसिन पत्रिकेत प्रदर्शित केलेल्या अभ्यासानुसार, जगभरात 40 कोटींहून अधिक रुग्ण हे मधुमेह- टाइप 2 ने ग्रस्त आहेत. यामुळे हृदयसंबंधित आजार, दृष्टी जाणं आणि सर्जरी करून शरीरातील एखादा अवयव दूर करण्याचा धोका अधिक संभवतो.

संशोधनात, ब्रिटन येथील केब्रिज महाविद्यालयातील संशोधक सहभागी होते. त्यांच्यामते, टाइप 2 मधुमेहाचे रुग्ण जीवनशैलीत सकारात्मक बदल आणि ध्यान यांच्या मदतीने नियंत्रण मिळवू शकता. कॅलरीवर नियंत्रण मिळवून आणि वजन कमी करून रुग्ण शरीरातील साखरेच्या स्तरावर नियंत्रण मिळवू शकतात.

संशोधनात समोर आलं की, ज्यांना मधुमेहाचा आजार झाल्याचं समोर आलं त्यांनी सलग आठ आठवडे दररोज 700 कॅलरी कमी करणारं भोजन केलं तर ते 10 पैकी नऊ रुग्णांचा आजार बरा होतो. तसेच अनेक वर्षांपासून जे या आजाराने त्रस्त आहेत तेही योग्य आहार आणि व्यायामाने यावर नियंत्रण मिळवू शकतात हे सिद्ध झालं आहे.

या Viral Photo मधून बिबट्या शोधून दाखवाच!

17 फुट लांब अजगर चढला पर्यटकांच्या गाडीवर, पाहा हा VIRAL VIDEO

या शहरांत मिळते जगभरातील सर्वात महाग कॉफी, या शहरांत मिळते जगभरातील सर्वात महाग

VIDEO: 'पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केलाय'; खडसेंची पहिली प्रतिक्रिया

First published: October 2, 2019, 8:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading