मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Diabetes : गोड खाण्याची सवय सुटतच नाही ना? हे उपाय करून पहा, ब्लड शुगर होईल कमी

Diabetes : गोड खाण्याची सवय सुटतच नाही ना? हे उपाय करून पहा, ब्लड शुगर होईल कमी

मधुमेहाच्या (diabetes) रुग्णांसाठी वजन नियंत्रणात ठेवणं देखील खूप महत्वाचं आहे. गोड खाल्ल्याने वजन वाढते. जर तुम्हाला गोड खाण्याची सवय असेल तर फळे खा, साखर मात्र पूर्णपणे टाळा.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : रक्तातील साखरेवर (blood sugar) नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयी बदलणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही गोष्टी वर्ज्य करून तुम्ही रक्तातील साखरेवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता. परंतु, काही जणांची गोड खाण्याची सवय काही केल्या कमी होत नाही आणि त्यामुळे मग खूप नुकसान होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी (diabetes patient how to control blood sugar level) तुम्हाला तुमच्या आहारातून काही गोष्टी पूर्णपणे काढून टाकाव्या लागतील.

गोड खाण्याची सवय असेल तर फळे खा -

तज्ज्ञांच्या मते, गोड पदार्थांचे सेवन केल्याने शरीर सक्रिय राहते, त्यामुळे बहुतेक लोक त्यांच्या आहारातून साखर पूर्णपणे काढून टाकू शकत नाहीत. त्यांच्या शरीराला गोड पदार्थ खाण्याची सवय झालेली असते. मात्र, मधुमेहाच्या (diabetes) रुग्णांसाठी वजन नियंत्रणात ठेवणं देखील खूप महत्वाचं आहे. गोड खाल्ल्याने वजन वाढते. जर तुम्हाला गोड खाण्याची सवय असेल तर फळे खा, साखर मात्र पूर्णपणे टाळा.

हे वाचा - प्रत्येक गावासाठी वेगळी रणनिती बनवा, लसीकरणाचा वेग वाढवा! पंतप्रधान मोदींच्या सूचना

या पद्धतीचे अवलंब करा

जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गोड दूध पित असाल तर ते रात्री पिण्याऐवजी दिवसातून त्याचे 2 भाग करून प्यावे. यामुळे वजन वाढणार नाही आणि साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

दररोज व्यायाम

जर तुमच्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण जास्त बनले असेल तर त्यामुळे साखर नियंत्रणात राहते. याशिवाय दररोज वर्कआउट करा, यामुळे तुमच्या शरीरातील प्रत्येक भागात रक्त प्रवाह सुधारेल आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

हे वाचा - पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला FB मित्राने मुलाखतीच्या नावाने बोलावलं आणि केला बलात्कार

रक्तातील साखर नियंत्रित करण्याचा प्रभावी मार्ग

तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कडुलिंबाची पाने, कोरफड किंवा कारल्याचे सेवन रिकाम्या पोटी केले जाऊ शकते. कारल्याचे सूप किंवा रस सेवन करणे हा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.

(सूचना : ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Diabetes, Health Tips