मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नाश्ता करताना करू नका ही चूक; डायबेटिसवर नियंत्रण ठेवायचं असेल तर हे आधी वाचा

नाश्ता करताना करू नका ही चूक; डायबेटिसवर नियंत्रण ठेवायचं असेल तर हे आधी वाचा

मधुमेहामुळे इतरही गंभीर आजार होतात. तसंच काही आजार गंभीर रूप धारण करतात. यामुळं डॉक्टर लोकांना मधुमेह होऊ नये म्हणून आणि मधुमेह झालेले रुग्ण अशा दोघांनाही सावध राहण्याचा सल्ला देतात.

    नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : मधुमेह (diabetes  हा असा आजार आहे, जो अलिकडे कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. त्यातच गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळं मधुमेहाचे रुग्ण (diabetes patient) झपाट्यानं वाढलेत. मधुमेहामुळे इतरही गंभीर आजार होतात. तसंच काही आजार गंभीर रूप धारण करतात. यामुळं डॉक्टर लोकांना मधुमेह होऊ नये म्हणून आणि मधुमेह झालेले रुग्ण अशा दोघांनाही सावध राहण्याचा सल्ला देतात. एका नवीन संशोधनात विशिष्ट वेळी आहार घेणाऱ्या लोकांमध्ये मधुमेह होण्याची शक्यता नगण्य आहे, असा निष्कर्ष समोर आलाय. हे संशोधन नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलंय. नुकतंच एंडोक्राइन सोसायटीच्या वार्षिक बैठकीत याचं विश्लेषण करण्यात आलं. संशोधकांना असं आढळलंय की, लोक नाश्ता करतात, त्या वेळेचा रक्तातील साखरेवर लक्षणीय परिणाम होतो. संशोधकांच्या मते, सकाळी उशिरा नाश्ता करणाऱ्यांच्या तुलनेत ज्यांनी सकाळी 8.30 च्या आधी नाश्ता केला त्यांच्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिन प्रतिरोध खूप कमी असल्याचं दिसून आलं. पूर्व मधुमेह (प्री-डायबिटीज) आणि मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये, रक्तातील साखरेची वाढ आणि इन्सुलिन हार्मोनची वाढ ही धोक्याची चिन्हे आहेत. हे वाचा - सेक्स वर्करने ग्राहकाला लावला 25 कोटींचा चुना; 68 वर्षीय व्यक्तीचं निघालं दिवाळं! जेवणाच्या प्रमाणापेक्षाही वेळ योग्य असणं आवश्यक – संशोधनात,  सकाळी साडेआठनंतर नाश्ता करणाऱ्यांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण आणि इन्सुलिन प्रतिरोध दोन्ही खूप जास्त असल्याचे दिसून आले. आजकाल वजन नियंत्रणासाठी विविध प्रकारचे डाएटिंग तंत्र अवलंबले जात आहे. अनेक संशोधने असा दावा करतात की, ठराविक वेळेत मध्यम आहार चयापचय आरोग्य सुधारतो. हे वाचा - PHOTOS: तालिबानी सत्तेत कृरतेचा कळस! चोरीच्या आरोप असलेल्या तिघांना घातल्या गोळ्या; नंतर भर चौकात क्रेननं लटकवलं जरी या नवीन संशोधनात, इंसुलिनचा रेजिस्टन्ट थोड्या-थोड्या वेळाने खाल्ल्याने वाढल्याचे दिसून आले, परंतु रक्तातील ग्लुकोजमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झाले नाहीत. तज्ञांचे म्हणणे आहे की, थोड्या-थोड्या अंतराने खाण्याऐवजी जेवणासाठी पूर्ण वेळ देणे चांगले आहे. परंतु, आपण जेवणाच्या योग्य वेळा पाळणे गरजेचे आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Diabetes, Tips for diabetes

    पुढील बातम्या