मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Diabetes And Watermelon - डायबेटीजच्या रुग्णांनी कलिंगड खावं का, काय असावं प्रमाण?

Diabetes And Watermelon - डायबेटीजच्या रुग्णांनी कलिंगड खावं का, काय असावं प्रमाण?

कलिंगडामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे ते खूप फायदेशीर ठरते. मात्र यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्सदेखील (Watermelon Contains Sugar And Carbohydrates) असतात. म्हणून डायबिटीजच्या रुग्णांचा आहार संतुलित असणे आवश्यक आहे.

कलिंगडामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे ते खूप फायदेशीर ठरते. मात्र यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्सदेखील (Watermelon Contains Sugar And Carbohydrates) असतात. म्हणून डायबिटीजच्या रुग्णांचा आहार संतुलित असणे आवश्यक आहे.

कलिंगडामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे ते खूप फायदेशीर ठरते. मात्र यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्सदेखील (Watermelon Contains Sugar And Carbohydrates) असतात. म्हणून डायबिटीजच्या रुग्णांचा आहार संतुलित असणे आवश्यक आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 29 मे : उन्हाळा (Summer Season) सुरु झाला की घाम आणि उष्णतेचा त्रास वाढायला सुरुवात होते. अनेकदा शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थिती आपल्या शरीरात पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी आणि शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पेयांचा आणि पदार्थांचा आहारात समावेश करतो. त्याचबरोबर उन्हाळ्यात आवर्जून खाल्ले जाणारे फळ कलिंगड (Watermelon) हेदेखील शरीर थंड ठेवण्यास मदत होते. कलिंगडामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे ते खूप फायदेशीर ठरते. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, जीवनसत्त्वे B1 आणि B6, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, लायकोपीन ही जीवनसत्व असतात (Watermelon Contains Vitamin A, Vitamins B1 and B6, Vitamin C, Potassium, Magnesium, Fiber, Iron, Calcium, Lycopene). मात्र बरेच लोक कलिंगड खाणे टाळतात. कारण त्यात भरपूर प्रमाणात नैसर्गिक साखर असते. आज आम्ही तुम्हाला मधुमेह असणाऱ्यांनी कलिंगड खावे की नाही? याबद्दल माहिती देणार आहोत.

मधुमेह म्हणजेच डायबिटीजचा त्रास असणाऱ्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. मधुमेह असलेल्या लोकांना फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो कारण ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मात्र फळांमध्ये नैसर्गिक साखर आणि कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्सदेखील असतात. म्हणून डायबिटीजच्या रुग्णांचा आहार संतुलित असणे आवश्यक आहे. प्रत्येक खाद्यपदार्थाचा एक ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) असतो. हा ग्लायसेमिक इंडेक्स खाल्लेले अन्न रक्तातील साखरेवर किती लवकर परिणाम करेल हे सांगतो.

हेही वाचा... लो-ग्लाइसेमिक इंडेक्स आहार हार्ट पेशंटचं वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर - स्टडी

एखाद्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स जेवढा कमी असेल तितक्याच हळूहळू तो रक्तातील साखरेमध्ये शोषली जाईल. या ग्लायसेमिन इंडेक्सचे मापन 0 ते 100 पर्यंत असते. हा आकडा जितका जास्त असेल तितक्या लवकर साखर रक्तात मिसळते. 70 किंवा त्याहून अधिक ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या खाद्यपदार्थांना उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ म्हणले जाते. कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index Of Watermelon) सुमारे 72 असल्यामुळे ते उच्च ग्लायसेमिक इंडेक्सच्या यादीत आहे. डायबिटीज फाउंडेशनचे (Diabetes Foundation) म्हणणे आहे की, 'कलिंगडामध्ये पाणी खूप जास्त प्रमाणात आढळते. 120 ग्रॅम कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 5 असतो. त्यामुळे ताजे कलिंगड खाण्यास हरकत नाही. मात्र कलिंगडाचा रस पिणे मधुमेहींसाठी योग्य नाही. कारण रसाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असू शकतो.'

अनेक संशोधकांचे म्हणणे आहे की, कोणत्याही पदार्थाचा ग्लायसेमिक लोडदेखील (Glycemic Load) विचारात घेतला पाहिजे. ग्लायसेमिक लोड, ग्लायसेमिक इंडेक्स आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण तपासून मोजला जातो. काही खाल्ल्याने रक्तातील साखर किती वाढेल, याची ग्लायसेमिक लोडवरून अचूक कल्पना येऊ शकेल. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या पदार्थांचे ग्लायसेमिक लोड 10 पेक्षा कमी आहे ते लो, ज्याचा ग्लायसेमिक लोड 10-19 आहे ते मिडीयम आणि 19 पेक्षा जास्त ग्लायसेमिक लोड असल्या ते जास्त मानले जाते. कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स 72 च्या जवळ आहे. परंतु 100 ग्रॅम कलिंगडाचा ग्लायसेमिक लोड 2 आहे. यावरून असे लकहस्त येते की, कलिंगड जर योग्य प्रमाणात खाल्ले तर मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही त्यामुळे नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे मधुमेह असलेले लोक हेल्दी फॅट्स, फायबर आणि प्रोटीनने समृद्ध असलेले पदार्थ जसे की, काजू किंवा खाण्यायोग्य बिया हे खाऊ शकतात. असे पदार्थ खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि रक्तात साखर पोहोचण्याची प्रक्रिया मंदावते.

हेही वाचा... Milk store tips: दूध नेहमी अशा भांड्यामध्ये ठेवायचं; उन्हाळा असला तरी खराब नाही होणार

टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांनी कसे खावे टरबूज

टाईप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) असलेल्या व्यक्तीने कलिंगड किंवा इतर कोणत्याही फळाचा नाश्त्यात किंवा अन्नामध्ये समावेश केला असेल, तर त्याला हेल्दी फॅट आणि प्रोटीन यांच्यासोबत आहार संतुलित करावा लागेल. कारण हेल्दी फॅट आणि प्रोटीन रक्तातील साखरेचे शोषण कमी करतात. इतर फळांप्रमाणे कलिंगडही नाश्त्यात किंवा जेवणात घेता येते. केवळ एका गोष्टीची काळजी घेणे अवश्यक आहे. टाईप 2 मधुमेह असलेली व्यक्ती कलिंगड खात असेल तर त्याने उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांसोबत कलिंगड खाणे टाळावे. त्याने कलिंगडासोबत नट, बिया, हेल्दी फॅट फूड आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नेहमी संतुलित आणि निरोगी आहार घ्यावा. ज्यामध्ये फळे आणि भाज्यांचा समावेश असेल. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, परंतु तरीही, मधुमेह असलेले लोक तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांच्या आहारात फळांचा समावेश करू शकतात. कमी साखर आणि जास्त फायबर असलेले पदार्थ खाणे चांगले. फळांचे रस, स्मूदी, पॅकेज केलेले ज्यूस पिणे टाळा. टरबूज व्यतिरिक्त संत्री, जांभूळ, द्राक्ष, सफरचंद, पीच, किवी, नाशपाती ही फळे खाऊ शकता.

First published:
top videos

    Tags: Diabetes, Fruit, Health, Lifestyle, Summer season