मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /डायबिटीज असतानाही स्मोकिंग करता? हे गंभीर परिणाम तुम्हाला माहित हवेच

डायबिटीज असतानाही स्मोकिंग करता? हे गंभीर परिणाम तुम्हाला माहित हवेच

मधुमेहींनी धूम्रपान केल्यास होतात हे दुष्परिणाम

मधुमेहींनी धूम्रपान केल्यास होतात हे दुष्परिणाम

मधुमेह हा पूर्णपणे जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होणारा आजार आहे. मधुमेह हा खूप जुना आजार आहे, पण अलीकडच्या काळात त्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 12 जानेवारी : मधुमेह हा असा आजार आहे, जो एकदा झाला की तो आयुष्यभर व्यक्तीसोबत राहतो. आपल्या सवयी बदलून त्यावर नियंत्रण ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही प्रभावी उपचार नाही. मधुमेह हा पूर्णपणे जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होणारा आजार आहे. मधुमेह हा खूप जुना आजार आहे, पण अलीकडच्या काळात त्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. काही काळापर्यंत हा आजार वृद्धांचा आजार म्हणून ओळखला जात होता, मात्र आता लहान मुलांनाही याचा त्रास होत आहे.

जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही, तेव्हा मधुमेहाची समस्या उद्भवते. अशा स्थितीत रुग्णाला बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन द्यावे लागते. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैली आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे. मात्र काही सवयी आहेत, ज्यामुळे मधुमेह वाढतो. न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी धुम्रपान आणि मधुमेहाबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

डायबिटीजमुळे जाऊ शकते दृष्टी! डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी

एक्सपर्टने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की धूम्रपानाचा मधुमेहावर कसा परिणाम होतो. त्या म्हणाल्या की, मधुमेहावर नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक आहे आणि धूम्रपानामुळे ते अधिक कठीण होते. वाढत्या मधुमेहासोबतच धुम्रपानामुळे अनेक गंभीर आजारांचाही धोका वाढतो. मधुमेहाच्या रुग्णांनी धूम्रपान केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊया.

मधुमेहींनी धूम्रपान केल्यास होतात हे दुष्परिणाम

धमन्या कठीण होतात : जर तुम्हाला मधुमेह आणि धुराचा त्रास होत असेल तर तुमच्या धमन्या अधिक कठीण होतात. यामुळे मधुमेहाची लक्षणे अधिक बिघडतात.

हृदयाच्या समस्या : ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांना जर धूम्रपान आणि तंबाखूचे व्यसन असेल. त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यांना हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

किडनीचे आजार : मधुमेहींनी धुम्रपान केल्याने आधीच अस्तित्वात असलेले आजार बळावतात. ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांना धूम्रपानाची सवय असेल. तर त्यामुळे किडनी आणि डोळ्यांचे आजार वाढू शकतात. कालांतराने ते गंभीर होत जातात.

Diabetes And Physiotherapy : फिजिओथेरपीद्वारे खरंच डायबिटीज कंट्रोल होऊ शकते का?

ग्लुकोज असामान्यता : अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिन अँड डायबिटीजमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालाबद्दल अंजली यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, धूम्रपानामुळे शरीरातील ग्लुकोजची असामान्यता वाढते.

अल्ब्युमिन्युरिया : धुम्रपानामुळे लघवीतील प्रोटीनचा धोका वाढतो, मज्जातंतूंचे नुकसान होते आणि जखमा भरण्यास विलंब होतो.

टाईप 2 मधुमेह : अनेक अहवालांमध्ये हे देखील समोर आले आहे की, इतरांपेक्षा धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका अनेक पटीने जास्त असतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:
top videos

    Tags: Diabetes, Health, Health Tips, Lifestyle