Home /News /lifestyle /

GOOD NEWS! अखेर कोरोनावर प्रभावी औषध सापडलं; रुग्णांसाठी ठरणार संजीवनी

GOOD NEWS! अखेर कोरोनावर प्रभावी औषध सापडलं; रुग्णांसाठी ठरणार संजीवनी

डेक्सामेथासोन (dexamethasone) औषधाची कोरोनाव्हायरसविरोधातील चाचणी अधिक परिणामकारक असल्याचं संशोधकांना दिसून आलं आहे,

    लंडन, 16 जून : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरसविरोधात (coronavius) प्रभावी असं औषध अखेर सापडलंच. डेक्सामेथासोन (dexamethasone) हे औषध कोरोनाला चांगलीच टक्कर देत असल्याचं चाचण्यांमध्ये दिसून आलं आहे.  गंभीर कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी हे औषध महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे हे औषध स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध होईल, असं असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाव्हायरसविरोधात उपलब्ध असलेल्या औषधांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यापैकीच एक औषध म्हणजे डेक्सामेथासोन. बीबीसी रिपोर्टनुसार, इतर औषधांच्या तुलनेत हे औषध जास्त परिणामकारक असल्याचा दावा यूकेतील संशोधकांनी केला आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या गंभीर रुग्णांच्या मृत्यूचा धोका या औषधामुळे कमी होतो आहे. हे वाचा - Made in India व्हेंटिलेटर पहिल्यांदाच उपलब्ध; 3000 युनिट अखेर रुग्णालयात 20 पैकी 19 कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच बरे होतात. जे रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, त्यापैकी बहुतेक रुग्ण बरे होतात. मात्र काही रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडते. अशा गंभीर रुग्णांवर उपचारासाठी डेक्सामेथासोन औषधाची मदत होऊ शकतं, असं तज्ज्ञ म्हणालेत. डेक्सामेथासोन औषधामुळे अशा रुग्णांच्या मृत्यूचा धोका कमी होतो, असं चाचणीत दिसून आलं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी चाचणीसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या 2 हजार रुग्णांना हे औषध दिलं आणि हे औषध न दिलेल्या 4 हजार रुग्णांशी तुलना केली. ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं, त्यापैकी व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचा धोका 40 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर आला. तर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचा धोका 25 वरून 20 टक्क्यांवर घटला. हे वाचा - लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका? शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता संशोधनाचे अभ्यासक प्राध्यापक पिटर हॉर्बाय म्हणाले, आतापर्यंत हे एकमेव औषध आहे, ज्यामुळे मृत्यूचा धोका कमी होत असल्याचं दिसून आलं आहे आणि हा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो आहे. ही अत्यंत महत्त्वाची प्रगती आहे. काय आहे डेक्सामेथासोन औषध? वेगवेगळ्या आजारांमध्ये शरीरामध्ये येणारी सूज कमी करण्यासाठी डेक्सामेथासोन औषध वापरलं जातं. शरीर ज्यावेळी कोरोना व्हायरसशी लढा देत असतं, त्यावेळी काही वेळा रोगप्रतिकारक शक्ती ओव्हरड्राईव्हमध्ये जाते म्हणजे अतिसक्रिय होते, याला सायटोकाईन स्टॉर्म म्हणतात. हे घातक असतं आणि शरीराला हानी पोहोचते. अशावेळी डेक्सामेथासोन शरीराचं नुकसान थांबवण्यासही मदत करतं. हे वाचा - पुढचे 2 आठवडे धोक्याचे! रोज 1 लाखांहून अधिक रुग्ण वाढणार, WHO चा इशारा जेव्हा कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला तेव्हा ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी या औषधाचा वापर केला असता तर 5 हजार लोकांचा जीव वाचवता आला असता आणि जे देश गरीब आहेत, जिथं कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी हे औषध ठरेल, असं शास्त्रज्ञ म्हणालेत. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - धारावी नव्हे तर मुंबईतील 'हा' भाग आता कोरोनाचा हॉटस्पॉट; आठवडाभरातच रुग्ण वाढले
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या