• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • तुमच्याही गळ्यात भेसळयुक्त चहा पावडर मारली जात नाही ना? अशी करा सोपी तपासणी

तुमच्याही गळ्यात भेसळयुक्त चहा पावडर मारली जात नाही ना? अशी करा सोपी तपासणी

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) सोशल मीडियावर भेसळयुक्त गोष्टींबद्दल लोकांना जागरूक करण्याचे काम करते. FSSAI व्हिडिओंद्वारे शुद्ध आणि भेसळयुक्त गोष्टींमधील फरक सांगत असतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : बाजारात मिळणारी प्रत्येक गोष्ट पूर्णपणे शुद्ध नसते. दैनंदिन वापरातील वस्तूंमध्येही इतकी बारीक भेसळ केली जाते की, ती सहज पकडता येणं अवघड असतं. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) सोशल मीडियावर भेसळयुक्त गोष्टींबद्दल लोकांना जागरूक करण्याचे काम करते. FSSAI व्हिडिओंद्वारे शुद्ध आणि भेसळयुक्त गोष्टींमधील फरक सांगत असतात. FSSAI ने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चहाच्या पानांची भेसळ शोधण्यासाठी एक अतिशय सोपी युक्ती सांगितली आहे. कशी ओळखावी चहा पावडरमधील भेसळ भेसळ करणारे अनेकदा खऱ्या चहा पावडरीच्या जागी किंवा त्यात मिसळून बनावट चहा पावडर विकतात. FSSAI च्या मते, चहा पावडरीची गुणवत्ता एका साध्या चाचणीने सहज तपासता येते. एक फिल्टर पेपर घ्या आणि त्यावर थोडी चहा पावडर ठेवा. आता त्यावर पाण्याचे काही थेंब टाकून ते ओले करा. आता हा फिल्टर पेपर नळाच्या पाण्याने धुवा. आता प्रकाशात जाऊन या फिल्टर पेपरवरील डाग तपासा. जर फिल्टर पेपरवर डाग नसेल तर ती खरी चहापावडर आहे, असे समजावे. दुसरीकडे, जर फिल्टर पेपरवर गडद-तपकिरी, गडद डाग पडले तर याचा अर्थ असा की ही चहा पावडर  बनावट आहे. या गोष्टींमध्येही भेसळ - याआधी एफएसएसएआयने काळ्या मिरीतील भेसळ ओळखण्याची युक्तीही सांगितली होती. एफएसएसएआयने व्हिडिओद्वारे सांगितले होते की, टेबलवर काळी मिरी ठेवा आणि आपल्या हातांनी दाबून पहा. काळी मिरी जी पूर्णपणे शुद्ध आहे ती सहज मोडणार नाही तर भेसळयुक्त काळी मिरी सहज मोडेल. भेसळ करणारे हे हलके काळ्या रंगाचे बेरी दाणे काळी मिरीमध्ये मिसळून विकतात आणि लोकांच्या आरोग्याशी खेळ करतात. तसेच लाल तिखट किंवा कांदा-लसूण चटणीमध्येही भेसळ केली जाते. FSSAI ने तेही ओळखण्याचा एक मार्ग सांगितला होता. यासाठी अर्धा ग्लास पाणी घ्या. त्यात एक चमचा लाल तिखट घाला. मिरचीला चमच्याने न ढवळता काचेच्या तळापर्यंत पोहोचू द्या. यानंतर भिजवलेली मिरची पावडर हातावर घेऊन हलके चोळा. जर ती घासताना तुम्हाला किरकिरी वाटत असेल तर ती भेसळ असू शकते. जर त्यामध्ये चिकटपणा वाटत असेल तर त्यात साबण पावडर वापरली गेलेली असू शकते.
  Published by:News18 Desk
  First published: