मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Besan Adulteration : सणासुदीला बेसन खरेदी करताना फसू नका; ही सोपी पद्धत वापरून भेसळ ओळखा

Besan Adulteration : सणासुदीला बेसन खरेदी करताना फसू नका; ही सोपी पद्धत वापरून भेसळ ओळखा

सणासुदीला बेसनाची (besan adulteration) खरेदीही मोठ्या प्रमाणात होते, ज्याचा वापर अनेक खास पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, बाजारात विकल्या जाणाऱ्या बेसनामध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते.

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : सणासुदीच्या काळात बाजारात भेसळयुक्त वस्तूंची सर्वाधिक विक्री होते. भेसळ करणारे वाईट वृत्तीचे लोक त्यांचे काम इतक्या चलाकीने करतात की, बाजारातील ग्राहकांना खरी वस्तू आणि नकली यात फरक करणं कठीण होऊन जातं. सणासुदीला बेसनाची (besan adulteration) खरेदीही मोठ्या प्रमाणात होते, ज्याचा वापर अनेक खास पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, बाजारात विकल्या जाणाऱ्या बेसनामध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते.

FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) ने आपल्या ट्विटर हँडलवर भेसळयुक्त बेसन ओळखण्याची एक पद्धत शेअर केली आहे. FSSAI नुसार, भेसळ करणारे अधिक नफा मिळविण्यासाठी बेसनाच्या पीठात खेसरी डाळीपासून बनवलेले पीठ मिसळून बेसन म्हणून विकतात. त्यामुळे बेसन पूर्वीसारखे शुद्ध राहत नाही आणि शरीराला त्यातून पुरेसे पोषक तत्वे मिळत नाहीत.

पण, एक सोपी युक्ती ग्राहकांना भेसळखोरांच्या या फसवणुकीपासून वाचवू शकते. यासाठी प्रथम एका टेस्ट ट्यूबमध्ये एक ग्रॅम बेसन घ्या. यानंतर, टेस्ट ट्यूबमध्ये 3 मिली पाणी घाला. आता तयार केलेल्या द्रावणात 2 एमएल कॉन्सेनट्रेटेड एचसीअल घाला. यानंतर, टेस्ट ट्यूब चांगली हलवा आणि द्रावण पूर्णपणे मिसळू द्या.

हे वाचा - विद्यार्थी शेर तर शिक्षक सव्वाशेर! परीक्षेत मुलाने दाखवली अजब क्रिएटिव्हिटी; सरांनीही दिलं भन्नाट उत्तर

जर टेस्ट ट्यूबमध्ये असलेले बेसन शुद्ध असेल तर द्रावणाचा रंग काहीच बदलणार नाही. मात्र, द्रावणाच्या पृष्ठभागावर पिंक म्हणजेच गुलाबी रंग दिसू लागला तर समजावे की, बेसनामध्ये भेसळ झाली आहे. वास्तविक हे मेटॅनिल पिवळ्या रंगावर एचसीएलच्या प्रक्रियेमुळे होते. दोन्हीच्या मिश्रणामुळे द्रावणाच्या पृष्ठभागावर गुलाबी रंग दिसून येतो.

First published:

Tags: Health Tips