भारताशिवाय या 5 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो गोकुळाष्टमी

भारताशिवाय या 5 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतो गोकुळाष्टमी

फक्त भारतातच नाही तर जगभरात श्रीकृष्णाचे भक्त आहेत. त्यामुळे फक्त भारतातच नाही तर जगभरात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

  • Share this:

गोकुळाष्टमी हा हिंदुंच्या प्रमुख सणांपैरी एक. संपूर्ण देशात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की फक्त भारतातच नाही तर जगभरात श्रीकृष्णाचे भक्त आहेत. त्यामुळे फक्त भारतातच नाही तर जगभरात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक देशांमध्ये कृष्णाची मोठ मोठी मंदिरं आहेत. सध्या संपूर्ण देश गोकुळाष्टमीच्या रंगात रंगलेला असताना आम्ही अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.

न्यूझीलंड- ऑस्ट्रेलियाच्या बाजूला हा देश आहे. सिटी ऑफ सेल्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या या देशातील ऑकलंड शहरात श्रीकृष्ण आणि राधाचं लोकप्रिय मंदिर आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी हे मंदिर सजवले जाते. मध्यरात्री प्रार्थना, भक्ती संगीतसह नेत्रदिपक दिव्यांनी हे मंदिर सजवले जाते. न्यूझीलंडमध्ये राहणारे सर्वाधिक भारतीय हे ऑकलंड शहरात राहतात. सध्या न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येमध्ये 4 टक्के लोकसंख्या ही भारतीयांची आहे.

कॅनडा- या देशातही भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गोकुळाष्टमीचा एक वेगळाच रंग इथे दिसून येतो. रिचमंड हिल येथील हिंदू मंदिरात तुम्ही भारतीय सणांचा आणि उत्सवांचा आनंद घेऊ शकता. मध्यरात्री या मंदिरातला शंखनाद आणि फुलांची उधळण तुम्ही कधीच विसरणार नाही.

मलेशिया- मलेशियातील कुआलालम्पुरमध्ये भारतीय वंशाचे लोक नाटक, नृत्याने श्रीकृष्णाचा जन्म मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. या दिवशी पूजेनंतर मिळणारा प्रसाद एवढा चविष्ट असतो की त्यासाठी मोठी रांग लागते.

पॅरिस- सिटी ऑफ लाइट्स अशी या शहराची ओळख आहे. पॅरिसमध्ये गोकुळाष्टमी साजरी केली जाते हे सांगून कोणाला फारसं पटणार नाही. पण हे खरंय गोकुळाष्टमीच्या दिवशी या शहरातील राधा पॅरिसीसवारा मंदिरात मोठ्या उत्साहात श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो.

सिंगापुर- सिंगापुरच्या बाजारपेठेत जेव्हा तुम्हाला श्रीकृष्णाच्या मुर्ती, बासुरी विकताना दिसतील तेव्हा तुम्ही भारताच्या बाहेर आलात यावर विश्वासच बसणार नाही. येथील श्रीलक्ष्मीनारायण मंदिरात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

रिलेशनशिपमध्ये असतानाही का पडतात दुसऱ्यांच्या प्रेमात?

सोलो ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहेत या 4 जागा

शरीरात अशा पद्धतीचे बदल घडत असतील तर वेळीच व्हा सावध, होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर

300 फूट खोल सप्तकुंड धबधब्यात पडला पर्यटक; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 01:44 PM IST

ताज्या बातम्या