'बस लँड करा दे...' Paragliding चा Video Viral झाल्यानंतरचे मीम पाहिलेत का?

'बस लँड करा दे...' Paragliding चा Video Viral झाल्यानंतरचे मीम पाहिलेत का?

त्याने हेही मान्य केलं की त्याच्याच एका मित्राने हा व्हिडीओ सर्वातआधी व्हायरल केला होता.

  • Share this:

आतापर्यंत अनेकांनी पॅराग्लायडिंगचा व्हायरल व्हिडिओ तर पाहिलाच असेल. एका रात्रीत पॅराग्लायडिंग करणारी ती हिरव्या शर्टची व्यक्ती स्टार झाली होती. आता या व्हिडिओचे अनेक मीम व्हायरल झाले आहेत. आता तर तो स्कायडायविंगसाठीही तयारी करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचा तो व्हिडीओ व्हायरल होईपर्यंत सध्या नेटिझन या व्हिडीओचा मनमुराद आनंद लुटत आहेत. या व्हिडीओत पॅराग्लायडिंग करणारी व्यक्ती हवेत असताना त्याच्या गाइडशी बोलताना दिसते. त्या दोघांचं संभाषण ऐकून तुम्ही हसणार नाही असं होऊच शकत नाही. या वर्षातला सर्वात मजेशीर व्हिडीओत या व्हिडीओचा समावेश करण्यात आला आहे. यावरूनच हा व्हिडीओ किती मजेशीर असेल याचा अंदाज येतो.

यात ती व्यक्ती गाइडला सतत लँड करा दे भाई असं सांगताना दिसते आणि मध्येच पॅराग्लायडिंग करायला आल्याचा पश्चाताप झाल्याचंही शिवीगाळने करत स्वतःशी बोलताना दिसते तर दुसरीकडे गाइड त्याला सतत पाय वर घेण्यास सांगताना दिसतो. व्हिडीओ संपेपर्यंत दोघंही एकमेकांना किती वैतागली होती ते दिसतं. हा व्हिडीओ जेव्हापासून व्हायरल झाला तेव्हापासून याचे हजारो मीम व्हायरल झाले आहे. सेक्रेड गेम्सच्या मॅशअपपासून ते जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमाच्या सिक्वलपर्यंत अनेक ठिकाणी या पॅराग्लायडिंगच्या व्हिडीओचे मीम झाले.

 

View this post on Instagram

 

😂😂 Original © Sahil Pawar

A post shared by Sarcasm Industry (@sarcasmindustry) on

एवढंच नाही तर Outlook ने त्या मुलाला शोधून काढले. 24 वर्षीय विपिन साहूला तो एवढा प्रसिद्ध होईल याची कल्पनाही नव्हती. वर्षातील सर्वोत्तम मीममध्ये त्याच्या व्हिडीओचे मीम आहेत असं जेव्हा त्याला कळलं तेव्हा तर त्याला विश्वासच बसला नाही. आयुष्यातला तो भयावह अनुभव विसरण्याचा विपिन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आउटलूकशी बोलताना त्याने हेही मान्य केलं की त्याच्याच एका मित्राने हा व्हिडीओ सर्वातआधी व्हायरल केला होता. गुगलवर 'paragliding in India' असं टाइप केलं तरी साहूचं नाव सर्चमध्ये येतं.

Ganesh Chaturthi 2019: घरात पैसा टिकत नसेल तर गणेश चतुर्थीला करा हे उपाय

वास्तूशास्त्र- पर्समध्ये या गोष्टी ठेवत असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर...

तुम्हाला माहितीये का सेक्ससाठीचा सर्वोत्तम दिवस आणि वेळ कोणता?

VIDEO: Ganesh Chaturthi 2019: दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी सूर्यमंदिराचा देखावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 02:33 PM IST

ताज्या बातम्या