मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Dental Care : दातांतील प्लाक काढण्यासाठी करा हे सोपे उपाय, पडणार नाही खर्चिक उपचारांची गरज

Dental Care : दातांतील प्लाक काढण्यासाठी करा हे सोपे उपाय, पडणार नाही खर्चिक उपचारांची गरज

दातांची घ्या काळजी- लहान मुलांच्या दातांसाठीही तीळ खूप फायदेशीर असतात. यामध्ये मुबलक प्रमाणात असलेले कॅल्शियम दातांना अनेक समस्यांपासून वाचवतात.

दातांची घ्या काळजी- लहान मुलांच्या दातांसाठीही तीळ खूप फायदेशीर असतात. यामध्ये मुबलक प्रमाणात असलेले कॅल्शियम दातांना अनेक समस्यांपासून वाचवतात.

टॉर्टर हा हिरड्यांच्या वरच्या आणि खालच्या भागात बॅक्टेरियाचा एक घन थर असतो. दातांमध्ये प्लाक आणि टॉर्टर बराच काळ राहिल्यास तुम्हाला अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 फेब्रुवारी : आपली वाईट जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर तसेच दातांवर परिणाम होतो. पूर्वी वय वाढल्यानंतर दात कमकुवत होण्याची समस्या (Plaque Remove Tips) दिसून येत होती. मात्र आता ही समस्या अनेकांमध्ये लहानपणापासूनच सुरू होते. सध्या दातांमध्ये प्लाक आणि टॉर्टरची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दातांमध्ये बॅक्टेरिया जमा झाल्यामुळे एक चिकट थर जमा होतो त्याला प्लाक म्हणतात. प्लॉकच्या समस्येमुळे अनेकजण लोकांमध्ये मिसळण्यास दचकतात.

टॉर्टर हा हिरड्यांच्या वरच्या आणि खालच्या भागात बॅक्टेरियाचा एक घन थर असतो. तुमच्या दातांमध्ये प्लाक आणि टॉर्टर बराच काळ राहिल्यास तुम्हाला अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. दीर्घकाळापर्यंत या दोन्ही समस्यांमुळे तुमचे दात पूर्णपणे कमकुवत होऊ शकतात आणि ते वयाच्या आधी तुटून पडू शकतात.

छोट्या वाटणाऱ्या या 4 चुका तरुणांच्या चेहऱ्याचा स्मार्टनेस घालवतात; आजपासूनच बदला

प्लाक घरी कसा काढावा

दातांवर जमा झालेला बॅक्टेरियाचा थर सहज काढता येतो. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला तुमच्या दात व्यवस्थित स्वच्छ करावे लागेल. अनेक दिवस साचत राहिल्याने काहीवेळा हा प्लाक खूप कठीण होतो. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या आरोग्य तज्ञाशी संपर्क साधून तो साफ करावा.

दिवसातून किमान दोनदा ब्रश करा

प्लाकच्या समस्येपासून दातांचे रक्षण करण्यासाठी आपण आपले दात व्यवस्थित स्वच्छ करणे महत्वाचे असते. दिवसातून किमान दोनदा ब्रश करा आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा जेवण झाल्यावर ब्रश करा. दातांमध्ये बॅक्टेरिया पसरू नयेत म्हणून किमान दोन मिनिटे ब्रश करा. घासताना पालेक काढण्याच्या प्रयत्नात जोमाने किंवा दाबाने ब्रश करू नका.

दातांचा आतील भाग देखील स्वच्छ करा

प्लाकपासून मुक्त होण्यासाठी आपण इलेक्ट्रिक ब्रश घेण्याचा देखील विचार करू शकता. ब्रश करताना लक्षात ठेवा की किमान पाच ते दहा मिनिटे ब्रश करा. ब्रश करताना ब्रशला 45 अंशाच्या कोनात हाताने धरा. अनेकदा लोक ब्रश करताना ही चूक करतात की ते फक्त दातांचा फक्त बाहेरचा भाग स्वच्छ करतात, परंतु प्लाकची समस्या आतील भागात कायम राहते आणि ती हळूहळू दातांवर पसरते.

या तेलाचा करा वापर

दात मजबूत करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. हे तेल दात मजबूत करण्यासोबतच तुमच्या दात किडण्यालाही प्रतिबंध करते. नारळ आणि ऑलिव्ह दोन्ही घसादुखीपासूनही आराम देतात. हे तेल वापरण्याच्या काही पद्धती आहेत. ब्रश केल्यानंतर एक चमचा नारळ किंवा ऑलिव्ह ऑइल घ्या आणि नंतर 20 ते 30 मिनिटे तोंडात फिरवा. नारळाच्या तेलामध्ये लॉरिक ऍसिडसारखे फॅटी ऍसिड असते जे बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम करते.

बेकिंग सोडा वापरा

प्लाकच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा देखील उपयुक्त आहे. संशोधकांना असे आढळून आले की ज्या लोकांनी बेकिंग सोड्याने दात घासले त्यांना सामान्य टूथब्रशच्या तुलनेत नंतर प्लेकची समस्या उशीरा होते.

डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

प्लाकमुळे होऊ शकतात गंभीर परिणाम

आपल्या आरोग्यासाठी आणि दातांच्या आरोग्यासाठी प्लाक ही एक मोठी समस्या आहे. अनेक दिवस प्लाक राहिल्याने दातांमध्ये पोकळी निर्माण होण्याची समस्या निर्माण होते. यामुळे हळूहळू दात किडायला लागतात आणि त्याचा परिणाम आपल्या हिरड्यांवरही होतो. प्लाकमुळे पिरियडॉन्टल नावाचा हिरड्यांचा आजार होतो.

First published:

Tags: Health Tips, Home remedies, Lifestyle