जगात सर्वांत आनंदी देश कोणता? हॅपीनेस इंडेक्समध्ये सलग 7 वेळा बाजी मारणाऱ्या या देशाच्या आनंदाचं रहस्य

अशी कोणती गोष्ट आहे, जी 'या' देशातील नागरिकांना सर्वात आनंदी ठेवते?

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 07:07 PM IST

जगात सर्वांत आनंदी देश कोणता? हॅपीनेस इंडेक्समध्ये सलग 7 वेळा बाजी मारणाऱ्या या देशाच्या आनंदाचं रहस्य

जगात सर्वात आनंदी असलेल्या देशांच्या यादीत डेन्मार्क या देशाने लागोपाठ सातव्यांदा टॉप तीनमध्ये स्थान मिळवलं आहे. 2018 च्या 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट'मध्ये 155 देशांचा समावेश होता. गेल्या सात वर्षांपासूनची ही परंपरा डेन्मार्कने कायम राखली. तर दुसरीकडे अमेरिका चवथ्या क्रमांकावरून 18 व्या क्रमांकावर खाली घसरली. ही कारणे आहेत जी डेन्मार्कला जगात सर्वात जास्त आनंदी देश बनवतात.

डेन्मार्कने लागोपाठ सातव्यांदा हा खिताब मिळवला असल्यामुळे 'अशी कोणती गोष्ट आहे, जी या देशातील नागरिकांना आनंदी ठेवते?' असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. त्यापाठीमागे इथल्या Hygge या संस्कृतीचं मोठं योगदान आहे असं विशेषज्ञ मानतात.

Hygge हा शब्द 2017 मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट करण्यात आला. 'Hygge' चा अर्थ आरामदायक असा होतो. वास्तविक पाहता हा शब्द अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी वापला जातो. पण मुख्यत्वे समाधान किंवा आत्मीयतेचं वातावरण तयार करणं या अर्थानेच या शब्दाचा प्रयोग केला जातो.

Loading...

Hygge ही अशी एक सायंकाळ असू शकते जी आवडत्या व्यक्तीसोबत घालवली. दिवसभर पडलेल्या कोवळ्या उन्हात फिरणंसुद्धा असू शकतं. मित्राबरोबर घेतलेली कॉफी असू शकते. थंडीच्या दिवसांत शेकोटीजवळ बसणंसुद्धा असू शकतं. मात्र, Hygge वर कन्वर्सेशन नावाच्या वेबसाइटने केलेल्या केलेल्या रिसर्चनुसरा डेन्मार्कमधले लोकं हा शब्द उत्तम स्वास्थ्य आणि आनंदी राहणं या अर्थानेच वापरतात.

वास्तविक पाहता, डेन्मार्कची Hygge ही संस्कृती लोकांना आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तणाव दूर करून लोकांमध्ये उत्साह निर्माण करते. कदाचित यामुळेच डेन्मार्कचे लोकं जगात सर्वात जास्त आनंदी असण्याचं कारण आहे.

डेन्मार्कमध्ये लोकांच्या समस्यांचं निवारण सरकारच करते. येथे शिक्षणासाठी येथे कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. तसंच आरोग्य सुविधाही निःशुल्क आहेत. डेन्मार्कमध्ये जी पेंशन प्रणाली आहे ती जगातील सर्वात उत्तम मानली जाते. जगात सर्वात जास्त टॅक्सचे दर याच देशात आहे. पण इथल्या जनतेचा त्यावर जास्त विश्वास आहे. त्यामुळे जास्त टॅक्स असुनही येथले नागरिक आनंदी असतात.

फार थोड्या गोष्टीसाठी डेन्मार्कचे लोकं चिंता करतात. त्यामुळे या देशातील नागरिकांना आनंदी राहणं सहज शक्य असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: denmark
First Published: Apr 23, 2019 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...