डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी उपयुक्त अशा 6 औषधी वनस्पती

डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी उपयुक्त अशा 6 औषधी वनस्पती

डेंग्यूच्या (dengue) उपचारात तुम्ही या औषधी वनस्पतींचा वापर करू शकता.

  • Last Updated: Nov 5, 2020 02:15 PM IST
  • Share this:

डेंग्यूवरील उपचारात थोडासा जरी उशीर किंवा दुर्लक्ष केलं तर प्राणघातक ठरू शकतं. डेंग्यूमुळे येणाऱ्या तापाला ब्रेकबोन किंवा हाडं मोडणारा तापदेखील म्हणतात कारण या तापात वेदना तीव्र असून ती हाडं मोडण्यासारखीच असतात. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. अजय मोहन यांनी सांगितलं की, अचानक तीव्र ताप, थंडी वाजून येणं, स्नायू दुखणं, सांधेदुखी, तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या, त्वचेचा लालसरपणा आणि जळजळ इत्यादी डेंग्यूची लक्षणं आहेत. या तापाची सुरुवातीची लक्षणं सौम्य असू शकतात, जी दिसायला सामान्य फ्लूप्रमाणेच दिसतात. काही प्रकरणांमध्ये हा ताप तीव्र होतो याला डीएचएफ म्हणजेच डेंग्यू हॅमोरॅजिक फिव्हर म्हणतात. यामुळे रुग्णाचा रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि मृत्यू होऊ शकतो.

डेंग्यूवर वेळीच उपचार करायला हवेत. काही प्रकारच्या वनस्पतींची पानं आणि गवत डेंग्यूच्या उपचारात उपयुक्त ठरू शकतात. त्यांचा उपयोग डेंग्यू तापाची लक्षणं कमी करण्यास मदत करू शकतो.

पपईची पानं

myupchar चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं की, पपईची पानं डेंग्यू तापाच्या नैसर्गिक उपचारांसाठी वापरली जाऊ शकतात. त्याची पानं चिरडून रस काढा आणि नंतर कापडाच्या सहाय्याने गाळून घ्या. हा शुद्ध रस प्या. पोषक आणि सेंद्रिय संयुगं यांचं मिश्रण प्लेटलेट्सची संख्या वाढवतं. यातील जीवनसत्त्व सी रोगप्रतिकारक शक्ती सुधारतं आणि रक्तातील विषारी द्रव बाहेर टाकण्यास मदत करतं.

कडूनिंबाची पानं

डेंग्यूच्या तापामध्ये कडूनिंबाच्या पानांचा अर्क पिणं फायदेशीर ठरतं. यामुळे रक्त प्लेटलेट्स तसंच पांढर्‍या रक्त पेशींमध्ये वाढ होते. कडूनिंबाच्या पानांचा रस रोगप्रतिकारक शक्ती सुधारू शकतो.

मेथीची पानं

मेथीची पानं ताप तसंच वेदना कमी करण्यात फायदेशीर ठरू शकतात. डेंग्यू तापाची लक्षणं कमी करण्यासाठी मेथीची पानं हा लोकप्रिय उपाय आहे. एवढंच नाही यामुळे चांगली झोप येण्यासही मदत होते.

तुळशीची पानं

आयुर्वेदिक औषधात डेंग्यू तापाच्या उपचारांसाठी बराच काळ तुळशीची पानं घेण्याची शिफारस केली जाते. तुळशीची पानं आणि काळी मिरी पाण्यात उकळवा आणि प्या. यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील वाढेल.

बार्ली/जव गवत

बार्लीपासून बनवलेला चहा प्या किंवा बार्ली गवत थेट खा. त्याच्या सेवनानं प्लेटलेट्सची संख्या वेगानं वाढेल.

गूळवेल

गूळवेल ही तापासाठी नव्वद टक्के आयुर्वेदिक औषधांमध्ये आवश्यक घटक म्हणून वापरली जाते. गूळवेलीचा उपयोग दीर्घकाळापर्यंत ताप आणि रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हे नैसर्गिकदृष्टया ज्वरनाशक आहे ज्यामुळे तापाची लक्षणं कमी होतात. यामुळे डेंग्यू तापाची लक्षणंही दूर होतात आणि रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते. गूळवेलीचे तुळशीच्या पानांसकट सेवन करणं अधिक फायदेशीर आहे.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - डेंग्यू: लक्षणे, कारणे, उपचार, औषध...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: November 5, 2020, 2:15 PM IST

ताज्या बातम्या