Home /News /lifestyle /

ऑनलाइन ऑर्डर करण्याआधी वाचा हा Amazon च्या डिलिव्हरी बॉयचा कारनामा

ऑनलाइन ऑर्डर करण्याआधी वाचा हा Amazon च्या डिलिव्हरी बॉयचा कारनामा

ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करणाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी ही बातमी. एका ग्राहकाने Amazon च्या साइटवरून स्मार्टफोन ऑर्डर केला.

    नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : सणासुदीचे दिवस साधून महत्त्वाच्या E commerce च्या कंपन्यांनी भरभक्कम डिस्काउंट जाहीर केले आहेत. अनेक लोकांनी या मेगासेलची संधी साधत महागड्या वस्तू ऑर्डर केल्या असतील. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी ही बातमी. एका ग्राहकाने Amazon च्या साइटवरून स्मार्टफोन ऑर्डर केला. ऑर्डर व्यवस्थित पूर्ण झाली. ग्राहकाला मेसेजही आला. पण डिलिव्हरी मिळणार त्या दिवशी डिलिव्हरी बॉयने मेसेज करून त्या ग्राहकाला तुमची ऑर्डर कंपनीकडून कॅन्सल झाल्याचा फोन केला. तुम्हाला कंपनीकडून रिफंड मिळेल, असंही त्याने सांगितलं. प्रत्यक्षात त्या ग्राहकाला फोन डिलिव्हर झाला असा मेसेज आला आणि त्याला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. ऑर्डर कंपनीने कॅन्सल केली असल्याचं खोटं सांगून मोबाईल परस्पर विकल्याची घटना दिल्लीत घडली आहे. या प्रकरणी डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, 19 तारखेला यासंदर्भात दक्षिण दिल्लीतल्या किडवई नगर भागात राहणाऱ्या ग्राहकाने तक्रार दाखल केली होती. 'आपण ऑर्डर केलेला मोबाईल देण्यासाठी 1 ऑक्टोबरला दिल्लीतील किडवाई नगरमध्ये घरी डिलिव्हरी बॉय आला होता. त्यावेळी त्याने मला तुमच्या मोबाईलची ऑर्डर कंपनीने कॅन्सल केल्याचं सांगितलं. त्याचबरोबर कंपनी नंतर रिफंड देणार असल्याचं देखील सांगितलं.' अॅमेझॉनवर ऑर्डरचे स्टेटस तपासलं असता त्याला तो मोबाईल डिलिव्हर झाल्याचे दाखवत होतं. त्यांनंतर त्यानी अमेझॉनच्या कस्टमर केअरला संपर्क साधला असता त्यांनी तो मोबाईल तुम्हाला डिलिव्हर झाल्याचं सांगितले. त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसानी फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी 420 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त अतुल कुमार ठाकूर यांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तपासात त्या डिलिव्हरी बॉयला अटक केली. त्यानंतर त्याने विकलेला फोन धरमवीर नावाच्या व्यक्तीकडून जप्त करण्यात आला. जो त्याने चोरून या व्यक्तीला विकला होता. यानंतर चौकशीमध्ये त्याने आपल्याला पैशांची गरज असल्याने आपण असं केल्याच सांगितलं.
    First published:

    Tags: Amazon, Shopping

    पुढील बातम्या