Home /News /lifestyle /

Diabetes: शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता ठरू शकते घातक; मधुमेहाचा धोका वाढू शकतो

Diabetes: शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता ठरू शकते घातक; मधुमेहाचा धोका वाढू शकतो

शरीरात व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाण शरीराची इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. इन्सुलिन हा एक हार्मोन आहे जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो. यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका कमी होतो. टाइप 2 मधुमेहामध्ये शरीर इन्सुलिनवर प्रतिक्रिया देत नाही.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 06 डिसेंबर : शरीरात व्हिटॅमिन डीच्या (Vitamin D) कमतरतेमुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी जीवनसत्त्वे आवश्यक असतात आणि शरीरात कोणत्याही जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अनेक रोग होऊ शकतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मधुमेहाचा धोका एका संशोधनानुसार, शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे देखील मधुमेह (Diabetics) होऊ शकतो. जेव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी खूप वाढते तेव्हा मधुमेह ही एक गंभीर स्थिती आहे. या स्थितीत शरीराला आवश्यक तेवढे इन्सुलिन तयार करता येत नाही किंवा शरीराच्या पेशी इन्सुलिनवर (Insulin) प्रतिक्रिया देत नाहीत. जाणून घ्या त्याचा काय परिणाम होतो 'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार व्हिटॅमिन डीला सूर्यप्रकाशातील जीवनसत्व देखील म्हटले जाते, कारण सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. जेव्हा सूर्यप्रकाश तुमच्या त्वचेवर पडतो, तेव्हा तुम्हाला त्यातून व्हिटॅमिन डी मिळते. याशिवाय अनेक खाद्यपदार्थांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व असते. व्हिटॅमिन डीची कमतरता हे मधुमेहासारख्या गंभीर आजाराचे प्रारंभिक लक्षण असू शकते, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी इंसुलिनची भूमिका Diabetes.co.uk च्या मते, शरीरात व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाण शरीराची इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते. इन्सुलिन हा एक हार्मोन आहे जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो. यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका कमी होतो. टाइप 2 मधुमेहामध्ये शरीर इन्सुलिनवर प्रतिक्रिया देत नाही. व्हिटॅमिन डीची योग्य पातळी अभ्यासात असेही म्हटले आहे की व्हिटॅमिन डीची पातळी प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. प्रत्येकाला व्हिटॅमिन डीची पातळी समान असणे आवश्यक नाही. व्हिटॅमिन डी इंफ्लामेशन कमी करते नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या रिव्हीवनुसार, शरीरातील इन्सुलिनच्या सामान्य प्रकाशनात व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाण इंफ्लामेशन कमी करते. हे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवण्यास मदत करते. हे वाचा - Benefits of Walnuts: हिवाळ्यात भिजवलेले अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; असा करा आहारात समावेश जेव्हा तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते, तेव्हा शरीरात होणार्‍या अनेक प्रक्रिया मंदावायला लागतात. त्यामुळे मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज काही वेळ उन्हात बसा. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत राहतील. ऑयली मासे, कॉड लिव्हर ऑइल, लाल मांस आणि अंड्यातील पिवळे बलक यासारख्या अनेक गोष्टींमध्ये व्हिटॅमिन डी चांगले असते. हे वाचा - Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल या गोष्टींची काळजी घ्या मात्र, लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी घेऊ नका. ते तुमच्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. दीर्घकाळापर्यंत व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेतल्याने शरीरात खूप जास्त कॅल्शियम तयार होते. हाडे कमकुवत होण्यासोबतच किडनी आणि हृदयालाही त्यामुळे नुकसान पोहोचू शकते. तज्ज्ञांच्या मते, सप्लिमेंट्सऐवजी सूर्यप्रकाशाने व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरेल. दुसरीकडे, तुम्ही सप्लिमेंट्स घेत असाल तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यावरच घ्या. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या