पहावं ते नवलंच! खिडकीची काच तोडून महिलेवर सांबारने मारली उडी, VIDEO VIRAL

सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली. काचेची खिडकी तोडल्यावर ते सांबार थेट महिलेवर जाऊन आदळले.

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2019 06:05 PM IST

पहावं ते नवलंच! खिडकीची काच तोडून महिलेवर सांबारने मारली उडी, VIDEO VIRAL

न्यूयॉर्कमधील एका हेअर सलूनमध्ये शनिवारी एक सांबार आत शिरलं. सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली. काचेची खिडकी तोडल्यावर ते सांबार थेट महिलेच्या डोक्यावरून जात सलूनच्या आतील भागात शिरलं आणि दुकानाची तोडफोड केली. सीबीएस न्यूजने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सांबार ज्या महिलेच्या अंगावर उडी घेतली ती महिला हेअर कटसाठी बसली होती. तिला गंभीर दुखापत झाली नसून थोडसं खरचटलं आहे.

गार्डियन न्यूजने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात सांबार सर्वात आधी काचेची खिडकी तोडून महिलेवर उडी घेताना दिसतो. यानंतर तो सलूनमधील अनेक गोष्टींची तोडफोड करतो. सांबारला अचानक पाहून सलूनमधील सर्व लोकांची दाणादाण उडते. सलूनमधून बाहेर जातानाही सांबार दरवाजा तोडतो आणि बाहेर पडतो.

या दुकानाची मालकीण जेनिसे हेरेदिया आहे. तिने एनबीसी न्यूजला दिलेल्या माहितीत सांगितले की, 'त्यावेळी माझ्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू होत्या. मला सुरुवातीला वाटलं की, एक वेगवान गाडी सलूनच्या आत आली. सांबारला पाहिल्यावर मी ओरडायला लागले. मला कळत नव्हतं की तेव्हा नक्की काय केलं पाहिजे होतं.'

सांबारने कोणालाही दुखापत केली नाही आणि स्वतःहूनच ते सलूनमधून निघून गेले. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून यावर अनेक कमेन्टही आल्या आहेत. एका युझरने लिहिले की, 'सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे कोणालाही इजा झाली नाही. अचानक सांबार समोर पाहिल्यावर लोकं घाबरली असतील.'

Loading...

देशातील या बँकांमध्ये मिळतंय 9 टक्क्यांनी व्याज, लवकर घ्या फायदा

या देशात प्रेम करायला मिळते सुट्टी, जाणून घ्या कोणती आहे ती जागा...

फ्लाइटसारख्या सीट आणि ऑटोमॅटिक डोअर, कोकणात जाणाऱ्या या गाडीचे पाहा INSIDE PHOTO

कुत्र्यांना फिरवायला गेलेल्या व्यक्तीवर कोसळली वीज, पाहा हा धक्कादायक VIRAL VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 9, 2019 02:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...