मुंबई, 02 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (sushant singh rajput) तो डिप्रेशनमध्ये (depression) असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबाबत (mental health) चर्चा सुरू झाली. मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे, हे लोकांना पटू लागलं. दरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोन (deepika padukon) मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी कित्येक वर्षांपासून काम करते आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर तिनं आता #DobaraPoocho ही मोहीम सुरू केली आहे.
दीपिकानेदेखील डिप्रेशनचा सामना केला आहे. त्याlतून बाहेर पडल्यानंतर तिने मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली. आपण ज्या परिस्थितीतून गेलो त्या परिस्थितीत असलेल्यांना आधार देऊ लागली आणि त्यांना व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहीत करू लागली. आता दीपिकाने फक्त मानसिक आरोग्याचा सामना करणाऱ्यांसाठी नव्हे तर प्रत्येकासाठी #DobaraPoocho ही मोहीम सुरू केली आहे.
आपल्या जवळची व्यक्ती मानसिक समस्या मानसिक आजार तर नाही ना हे समजून घेणं किती महत्त्वाचं आहे, हा #DobaraPoocho या मोहिमेमागील उद्देश आहे. दीपिकाने आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.
या पोस्टमध्ये दीपिका म्हणते, एखादी व्यक्ती वरवर खूप छान, आनंदी आहे असं दिसत असेल मात्र आतून ती डिप्रेशनमध्ये असू शकते. त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांना आधार देणं खूप गरजेचं असं आणि त्यांना नेमकी कोणती गोष्ट सतावत आहे, त्यांना कोणत्या समस्या आहेत ऐकून घेणंही खूप महत्त्वाचं आहे"
हे वाचा - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींची शुक्रवारी होणार चौकशी
"आता आपल्याला आधीपेक्षा अधिक संवेदनशील होण्याची आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना मानसिक आधार देण्याची गरज आहे. #DobaraPoocho #MentalHealthMatters", असं तिनं म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यातदेखील सुशांतच्या आत्महत्येनंतर दीपिकाने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती म्हणाली, "पाच वर्षांपूर्वी मीदेखील या सर्व परिस्थितीतून गेले आहे आणि आता अचानक झालेल्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. मानसिक आरोग्याला प्राधान्य द्यायला हवं आणि आत्महत्यांना प्रतिबंध करण्यावर लक्ष केंद्रीत द्यायला हवं, हे आता आपणा सर्वांना समजलं आहे"
हे वाचा - मोठ्या पडद्यावरील सुशांतच्या आठवणीत नेणारा VIDEO!नेहा कक्करचे म्यूझिकल ट्रिब्यूट
दीपिका स्वत: डिप्रेशनमधून गेली आहे. यानंतर तिनं द लिव्ह लव्ह लाइफ फाऊंडेशनची स्थापना केली. ज्या माध्यमातून ती मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करत असते. यासाठी तिला वर्ल्ड एकोनोमिक फोरममध्ये क्रिस्टल अवॉर्डही मिळाला आहे.
संपादन - प्रिया लाड