ताण दूर करण्यासाठी घ्या शांत झोप, बुद्धीला मिळेल चालना- रिसर्च

ताण दूर करण्यासाठी घ्या शांत झोप, बुद्धीला मिळेल चालना- रिसर्च

जगभरात सगळ्यात कमी झोप घेणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये भारता दुसऱ्या क्रमांकावर आहे.

  • Share this:

कॅलिफोर्निया, 10 नोव्हेंबर: अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिवर्सिटीमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार गाढ झोप घेण्यामुळे 30 टक्के तणाव दूर होतो असा दावा करण्यात आला आहे. जगभरात सध्या झोप न लागण्याच्या आजाराचं प्रमाण लोकांमध्ये झपाट्यानं वाढत असल्याचं या रिसर्चमधून समोर आलं आहे. भारतात सर्वाधित तर दुसऱ्या क्रमांकावर चीन असल्याचा दावा करण्यात आला आहे. झोप झाल्यामुळे लोकांचा स्वभाव चिडचिडा होतो आणि त्याचा परिणाम दिवसभरातील कामांवर होत असल्याचंही या रिसर्चमध्ये म्हटलं आहे. त्याचा परिणाम तुमच्या मानवर होऊन तुमची विचार करण्याची क्षमता खुंटते. त्यामुळे नुसती झोप न घेता ती गाढ झोप असावी असा दावा या युनिवर्सिटीत केलेल्या अभ्यासानुसार करण्यात आला आहे.

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमध्ये आपल्या झोपेचे आणि झोपेच्या वेळेचे तीन तेरा वाजतात. अगदी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत निद्रानाशाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. मोबाईलचा अतिवापर, कामाचं टेन्शन यामुळे आपल्या झोपेवर त्याचा परिणाम होतो. नुसती 6 तास झोप घेतली म्हणजे झालं असं नाही तर तुम्ही झोपेतही तुमच्या कामाचा आणि असलेल्या टेन्शनचा सतत विचार करत असता. त्यामुळे मेंदू थकतो आणि त्याची विचार करण्याची ताकद कमी होते. मात्र याबाबत अमेरिकेत केलेल्या रिसर्चनुसार तुम्ही जर गाढ झोप घेतलीत तर ताजेतवाने राहता आणि 30 टक्क्यांपर्यंत तुमचं टेन्शन तूर होतं. तुमचा विचार करण्याच्या क्षमतेचाही वेग वाढतो. जेव्हा तुम्ही गाढ झोप घेत असता तेव्हा तुमच्या शरीरासोबत मेंदूही विचार करण्य़ासाठी ब्रेक घेतो. त्यामुळे त्याला आराम मिळत असतो. याचा परिणाम मनावरही होत असतो. तुम्ही नकारात्मकतेकडून सकारात्मक विचारांकडे आकर्षित होता. त्यामुळे तुमचं मन आणि चेहरा प्रसन्न राहातो आणि तुम्ही करत असलेलं कामही योग्य आणि चांगलं होतं. हेच तुम्ही नुसती 6 तास झोप घेतली तरीही ती गाढ नसेल तर तुम्हाला दिवसभर आळस, थकवा आणि नकारात्मक वाटत राहातं.

कामातील वाढत्या तणावामुळे गाढ झोप होत नाही. काहीवेळा कामामुळे आपण झोपण्यासाठी टाळाटाळ करतो. भारतात जवळपास 10 कोटी लोक निद्रानाशाच्या आजाराने ग्रस्त आहेत. सर्वात कमी झोप घेणाऱ्या लोकांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे त्या लोकांच्या दैनंदिन आयुष्यावरही त्याचा मोठा परिणाम होत असल्याचं या रिसर्चमधून समोर आलं आहे.

गाढ आणि शांत झोप लागण्यासाठी काय करावं?

किमान 1 तास आधी टीव्ही आणि मोबाईल बंद करा. त्यावेजी वाचनावर भर द्या.

रोज रात्री झोपण्याआधी ध्यान किंवा मेडिटेशन अवश्य करा. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रीत करायला सुरुवात करा.

दुसऱ्या दिवसाचं नियोजन करा. शक्य असेल तर त्याची यादी तयार करा. दुसऱ्या दिवसाच्या कामाची तयारी आधीच करून ठेवा.

शांत किंवा शास्त्रीय संगीत ऐकल्यामुळे शांत झोप लागते.

दिवसभर घडलेल्या गोष्टीचा नकारात्मक विचार करणं बंद करा. शक्य तितका सकारात्मक विचार करण्यावर भर द्या ज्यामुळे रात्रीही झोपेत नकारात्मक भावना निर्माण होणार नाहीत.

या काही सोप्या पद्धतीनं तुम्ही शांत झोप लागण्यासाठी मदत होऊ शकते. तुम्ही शांत आणि गाढ झोपलात तर तुम्ही अधिक प्रसन्न राहता. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सकारात्मकपणे तोंड देण्याची ऊर्जा तुमच्यात तयार होत असते.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 10, 2019, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading