मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Deep Breathing Benefits : दीर्घ श्वास घेण्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहित नसतील, एकदा नक्क्की वाचा

Deep Breathing Benefits : दीर्घ श्वास घेण्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहित नसतील, एकदा नक्क्की वाचा

जर तुम्ही तुमच्या श्वासोच्छवासाची पद्धत बदलली आणि लहान श्वास घेण्याऐवजी दीर्घ श्वास घेतला तर ते तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मदत करते आणि तुमचे आरोग्य सुधारते.

जर तुम्ही तुमच्या श्वासोच्छवासाची पद्धत बदलली आणि लहान श्वास घेण्याऐवजी दीर्घ श्वास घेतला तर ते तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मदत करते आणि तुमचे आरोग्य सुधारते.

जर तुम्ही तुमच्या श्वासोच्छवासाची पद्धत बदलली आणि लहान श्वास घेण्याऐवजी दीर्घ श्वास घेतला तर ते तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मदत करते आणि तुमचे आरोग्य सुधारते.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 8 ऑगस्ट : जर तुम्ही अस्वस्थ असाल आणि काय करावे हे समजत नसेल तर सर्वप्रथम तुम्ही खाली बसा आणि दीर्घ श्वास घ्या. काही सेकंदांसाठी तुमचा श्वास रोखून ठेवा. तुम्हाला स्वतःमध्ये खूप फरक जाणवेल. खरं तर, आपण आपल्या व्यस्त दिनचर्येत दीर्घ श्वास घेण्यास विसरलो आहोत. ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण नीट होत नाही आणि थोड्याशा तणावातही आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. जर तुम्ही तुमची श्वासोच्छ्वासाची पद्धत बदलली आणि लहान श्वास घेण्याऐवजी दीर्घ श्वास घेतले तर ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या सुदृढ बनवेल. तुम्हाला हे जाणवेल की तुमची फुफ्फुस, रक्तदाब हे सर्व चांगले काम करत आहेत. आजच्या जीवनशैलीसाठी मोकळा श्वास घेणे खूप महत्त्वाचे आहे. झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, दररोज काही मिनिटे दीर्घ श्वास घेतल्याने अनेक प्रकारच्या तणाव आणि चिंतांपासून आराम मिळू शकतो. नियमित दीर्घ श्वास घेण्याचे फायदे एन्गझायटी, चिंता दूर करण्यासाठी प्रभावी : तुमचा श्वास हा तुमच्या मानसिक आरोग्याचा आरसा आहे. हा संथ, लयबद्ध श्वास पॅरासिम्पेथेटिक नर्वस सिस्टिमला उत्तेजित करतो, ज्यामुळे हृदय गती कमी होते आणि स्नायू आणि मेंदूला आराम मिळतो. आत्मप्रेमाची भावना : श्वासोच्छवासाद्वारे आपण आपले विचार आपल्या मनातून बाहेर काढू शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासाशी संपर्क साधू शकाल, तेव्हा तुम्हाला स्वतःशी एक सखोल संबंध जाणवू लागतो. यातून स्वत:विषयीच्या प्रेमाची प्रक्रिया सुरू होते.

डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी या पदार्थांचा करा आहारात समावेश, मानसिक आरोग्यही सुधारेल

चांगली झोप येते : श्वासोच्छवासाचे व्यायाम थेट आपल्या पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टीमवर परिणाम करतात आणि शरीराला शांत होण्याचा संकेत देतात. यामुळे गाढ आणि शांत झोप लागते. प्रतिकारशक्ती वाढेल : डायाफ्रामॅटिक श्वासोच्छवासामुळे फुफ्फुसांचा विस्तार होतो, ऑक्सिजनचे शोषण सुधारते, कोर्टिसोलची पातळी कमी होते, रक्तदाब कमी होतो, अटोनॉमिक नर्वस सिस्टीम सुधारते, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते.
View this post on Instagram

A post shared by Vatsion (@vatsionutrition)

जगण्यास प्रवृत्त करते : श्वासोच्छवासाचे व्यायाम आपल्याला अतिविचार करण्यापासून प्रतिबंधित करतात आणि आपल्याला सजग राहण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे आपल्याला वर्तमानातील क्षणाशी कनेक्ट होता येते. तणावापासून मुक्तता : जेव्हा तणाव असतो तेव्हा आपण उथळ श्वास घेतो ज्यामुळे डायाफ्रामच्या हालचालींची संपूर्ण श्रेणी मर्यादित होते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला तणावाची पातळी वाढत असल्याचे जाणवेल तेव्हा एक हात पोटावर ठेवा आणि नाकातून दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना 6 मोजा. आता तुमचं पोट वर येताना आणि खाली पडताना अनुभवा. 1 मिनिटासाठी हे पुन्हा करा. Food For Memory : स्मरणशक्ती वाढवतील हे पदार्थ, माईंड सुपरफास्ट होण्यासाठी असा असावा आहा पचनक्रिया सुधारते : योग्य प्रकारे श्वास घेतल्याने, रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे पचन अवयव चांगले कार्य करण्यास मदत होते. तसेच ते पचनक्रिया गतिमान करते. ऊर्जा मिळते : श्वासोच्छवासामुळे रक्तातील ऑक्सिजन क्षमता सुधारते. ज्यामुळे ऊर्जा पातळी आणि स्टॅमिना वाढतो.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Mental health

पुढील बातम्या