125 मुलांचा जीव खरंच लिची खाल्ल्याने गेला का? फळं खाताना घ्या 'ही' काळजी

125 मुलांचा जीव खरंच लिची खाल्ल्याने गेला का? फळं खाताना घ्या 'ही' काळजी

बिहारमध्ये 125 मुलांचा जीव 'चमकी तापा'ने गेला. या मुलांनी लिची खाल्ल्याने जीवघेणा ताप आल्याचं बोललं जातं. खरंच हे फळ खाणं धोकादायक आहे का? काय आहेत तथ्यं?

  • Share this:

पाटणा, 17 जून : बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात 'चमकी' तापाने 125 मुलं मृत्युमुखी पडली. सुरुवातीला हा ताप कशामुळे येतो, नेमकं या मुलांच्या खाण्यात काय आलं हे स्पष्ट होत नव्हतं.  अॅक्युट इन्सेफलाइटिस सिंड्रोम (AES) या प्रकारच्या तापाने मृत्यू झाल्याचं नंतर उघड झालं. या मुलांनी लिचीची फळं खाल्ल्याने हा प्रकार घडला, अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या. या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे? बिहारमध्ये सर्वाधिक मिळणारी लिची आणि तिच्या सेवनाने मृत्युमुखी पडण्याचा प्रकार याआधीही 2014 मध्ये घडला होता. बिहारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘हायपोग्लाइसीमिया’ म्हणजेच शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक कमी झाल्याने मुलांचा मृत्यु झाला आहे.

खरंच लिची धोकादायक आहे का?

लिची हे फळ शरीरासाठी धोकादायक नाही. जगभरात नावाजलेल्या आणि विज्ञानाला वाहिलेल्या 'द लॅन्सेट' या नियतकालिकात आलेल्या माहितीनुसार लिचीमध्ये हायपोग्लायसिन-ए आणि मेथिलीन साइक्लोप्रोपाइल ग्लाइसीन असतं. ते शरीरातलं साखरेचं प्रमाण कमी करतं. त्यामुळे ते कच्चं किंवा उपाशीपोटी खाल्याने धोका निर्माण होऊ शकतो. त्यामध्ये असणारं फोलेट शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. याशिवाय, लिचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, आयर्न अशी पोषक तत्त्व आढळतात.

लिची खाण्याआधी घ्या ‘ही’ काळजी

  • न पिकलेली लिची खाणं टाळा. त्यामध्ये Hypoglycin A and methylenecyclo propyl-glycine (MCPG) असतं आणि असं कच्चं फळ जास्त खाल्याने उलट्या होण्याची शक्यता असते. Hypoglycemic A म्हणजेच नैर्सगिकरीत्या आढळणारे अमिनो अॅसिड.
  • फळामधील बिया खाऊ नयेत. methylenecyclopropyl-glycine (MCPG) हे लिचीचमधील बियांमध्ये असते. या बिया खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक कमी होते.
  • ती खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून खावीत. कारण लिचीच्या शेतीकरिता प्रतिबंधित एंडोसल्फॉन आणि अनेक कीटनाशकं वापरली जातात. ही कीटनाशकं शरीरासाठी हानीकारक असतात.
  • ही फळं रिकाम्या पोटी खाऊ नयेत.
  • लिची अती प्रमाणात खाऊ नयेत. एका वेळी 7-8 फळांपेक्षा जास्त फळं न खाल्लेली बरी.
  • फळावरील साल काढून खावे. त्या सालांमध्ये रसायने असू शकतात.

इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देशभरात बंदची हाक, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 17, 2019, 5:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading