मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

काय सांगता! आता डॉग मिळवून देईल तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड; कसं ते पाहा

काय सांगता! आता डॉग मिळवून देईल तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड; कसं ते पाहा

गर्लफ्रेंड मिळवून देण्यात श्वान करणार तुमची मदत. (प्रतीकात्मक फोटो - सौजन्य - Pixabay)

गर्लफ्रेंड मिळवून देण्यात श्वान करणार तुमची मदत. (प्रतीकात्मक फोटो - सौजन्य - Pixabay)

एका संशोधनानुसार माणसांच्या बहुतेक कामात मदत करणारा श्वान त्यांना त्यांची गर्लफ्रेंड मिळवून देण्यातही मदत करू शकतो.

    माद्रिद, 16 ऑगस्ट : गर्लफ्रेंड हवी म्हणून काही तरुण काय काय नाही करत. तरी काहींना गर्लफ्रेंड सहजासहजी मिळत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल आता डॉग तुम्हाला गर्लफ्रेंड मिळवून देऊ शकतात. तुम्हाला हे थोडं विचित्र  एका संशोधनातून हा खुलासा झाला आहे. डेटिंग अॅप किंवा साइट्सवर  गर्लफ्रेंड मिळवून देण्यात श्वान तुम्हाला मदत करतील. आता हे कसं शक्य आहे ते तुम्हीच पाहा. कुत्रा हा प्राणी माणसांच्या बऱ्याच कामी येतो. मग ते घराचं संरक्षण असो वा घरातील कामं, श्वान अगदी हुशारीने, मेहनतीने ते करताना दिसतात. अगदी देशसेवेत असलेले पोलीस पथक, बॉम्बशोधक पथक अशा टीममध्येही श्वान असतात हे तुम्हाला माहितीच आहे. पण आता तुमच्या पर्सनल लाइफमध्येही याच श्वानाची मदत होणार आहे. स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ जाएनने एक संशोधन केलं आहे. ज्यात  300 वेगवेगळ्या कॉलेजमधील विद्यार्थीनींचा या संशोधनात समावेश होता. या संशोधनात सहभागी झालेल्या तरुणींना काही पुरुष आणि महिलांसोबत श्वानासोबत आणि काही त्यांच्या एकट्याचे फोटो दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. हे वाचा - नवरीबाईचा VIDEO पाहून हादरला नवरदेव; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला घटस्फोट मिररच्या रिपोर्टनुसार या संशोधनात दिसून आलं ज्यांचा फोटो डॉगसोबत आहे, त्यांच्याकडे तरुणी जास्त आकर्षित होतात. ज्या तरुणांच्या फोटोत त्यांच्यासोबत छोटा डॉग आहे, अशा तरुणांकडे तरुणी लवकर आकर्षित होतात. ज्यांच्याकडे पाळीव श्वान नाही, त्यांच्याबाबत त्यांना खास आकर्षण वाटत नाही, असं दिसून आलं. रेडिटवर एका तरुणीने या संशोधनाबाबत माहिती पोस्ट केली आहे. त्यानंतर बऱ्याच तरुणांनी आपल्या प्रोफाइल पिक्चरवर छोट्या श्वानांसोबत फोटो लावायला सुरुवात केली आहे. काहींनी तर स्वतःकडे कुत्रा नसेल तर दुसऱ्यांच्या कुत्र्यासोबत फोटो काढले आहेत. असा दावा तिने केला आहे. हे वाचा - नवरदेवाने लग्नातील आवडीचे पदार्थ रद्द केल्याने नाराज झाली नवरी; घेतला मोठा निर्णय हा फंडा यशस्वी होईलच याची खात्री तर आम्ही देत नाही. तो किती यशस्वी ठरेल हे आम्हाला माहिती नाही. पण तुम्हीही गर्लफ्रेंड शोध असाल तर मग एकदा हा फंडा आजमावून पाहायला हरकत नाही. मग तुम्हीही हा फंडा वापरून पाहा आणि त्याचा काय रिझल्ट मिळाला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Relationship, Relationship tips

    पुढील बातम्या