मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Dasara 2022 : फक्त म्हणायला नाही खरंच 'सोनं' आहेत आपट्याची पानं; फायदे वाचून थक्क व्हाल

Dasara 2022 : फक्त म्हणायला नाही खरंच 'सोनं' आहेत आपट्याची पानं; फायदे वाचून थक्क व्हाल

दसऱ्याला सोनं म्हणून आपण आपट्याच्या झाडाची पानं एकमेकांना वाटतो आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. या पानांचे फायदेही बरेच आहेत.

दसऱ्याला सोनं म्हणून आपण आपट्याच्या झाडाची पानं एकमेकांना वाटतो आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. या पानांचे फायदेही बरेच आहेत.

दसऱ्याला सोनं म्हणून आपण आपट्याच्या झाडाची पानं एकमेकांना वाटतो आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. या पानांचे फायदेही बरेच आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 4 ऑक्टोबर : भारताला विविध परंपरा आणि संस्कृतींचा वारसा मिळालेला आहे. आपणही या सर्व परंपरा पाळतो आणि केवळ पळत नाही त्या उत्साहाने साजऱ्या करतो. कारण आपल्याकडील चांगल्या परंपरांमागे तितकेच चांगले कारणदेखील असते. अशीच एक परंपरा आपण पाळतो. ती म्हणजे दसऱ्याला आपट्याची पानं वाटण्याची. दसऱ्याला आपट्याच्या झाडाची पानं ज्याला आपण सोनं असं म्हणतो ते एकमेकांना वाटतो आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो.

मात्र ही आपट्याची पानं केवळ दसऱ्याला वाटण्यापुरतीच उपयुक्त नाहीत. तर याचे अनेक आरोग्य फायदेदेखील आहेत. या पानांचे औषधी उपयोग अनेकांना माहीत नाहीत. आपटा किंवा बौहिनिया रेसमोसा नावाच्या झाडाच्या पानांना दसऱ्याला वाटले जाणारे सोने असेदेखील संबोधतात. आज आम्ही तुम्हाला आपट्याच्या झाडाच्या औषधी गुणधर्माविषयी आणि ते विविध आजारांवर कसे वापरायचे याविषयी माहिती देणार आहोत.

कच्चे गाजर खाण्याचे शरीरासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

या समस्यांपासून आपट्याची पानं देतात मुक्ती

अतिसार

जेव्हा खूप जुलाब किंवा अतिसार होत असेल तेव्हा आपट्याची ही पानं तुम्हाला अराम मिळवून देऊ शकतात. यासाठी आपट्याच्या पानांचा रस काढावा. रस काढण्यासाठी आपट्याची पानं काहीकाळ पाण्यात भिजवून ठेवावी. आणि त्यानंतर ही पानं कपभर पाण्यासोबत कुटून घ्यावी. त्यानंतर स्वच्छ सुती कापडातून हा रस गाळून घ्यावा. कांदा आणि मिऱ्यासोबत हा रस घ्यावा. याने अतिसाराच्या समस्येमध्ये खूप फायदा होतो.

तापादरम्यान डोकेदुखी

ताप आलेला असताताना आपले सर्व अंग दुखते. मात्र तुम्हाला जर जास्त प्रमाणात डोकेदुखी होत असेल तर आपट्याची पानं वापरा. यासाठी आपट्याची पानं कुटून त्याचा कल्क किंवा लेप तयार करा आणि तो डोक्यावर लावा. याने तुम्हाला डोकेदुखीमध्ये खूप आराम मिळेल.

लघवीमध्ये जळजळ होणे

अनेकदा आपल्या काही कारणास्तव लघवीच्या जागी जळजळ होते. लघवी करता खूप त्रास होतो. या समस्येवरही आपट्याची पानं फायदेशीर ठरू शकतात. यासाठी आपट्याच्या पानांचा रस आणि दूध एकत्र सेवन करा.

Dasara 2022 : दसऱ्यासाठी अगदी कमी वेळेत असं सजवा तुमचं घर; पाहुणेही पाहतच राहतील

जखमा आणि वेदनेवर आराम

जर तुम्हाला एखाद्या जागी वेदना होत असेल तर आपट्याचं एक पान घ्या आणि ते ओलं करून वेदना होत असलेल्या जागी लावा. त्यावर चिकटपट्टी लावून ते एक दिवस तसेच राहू द्या. यामुळे तुम्हाला वेदनेपासून अराम मिळेल. तसेच तुम्हाला एखाद्या जागी जखम झाली असेल तर त्यावर आपट्याच्या पानांचा पल्प लावावा. याने तुमची जखमाही लवकर बरी होईल.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle