डेंग्यूपासून वाचायचंय.. तर या रंगाचे मोजे घालणं टाळा!

डेंग्यूचे मच्छर ओळखणं फार सोप्प आहे. ते इतर मच्छरांपेक्षा दिसायला पूर्णपणे वेगळे असतात. ते गडद रंगाचे असतात आणि त्यावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 03:37 PM IST

डेंग्यूपासून वाचायचंय.. तर या रंगाचे मोजे घालणं टाळा!

पावसाळ्यात मच्छरांच्यां संख्येत प्रचंड वाढ होते. याचमुळे या ऋतूत स्वतःची अधिक काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात शक्यतो गडद रंगाचे कपडे आणि मोजे घालणं टाळा. डेंग्यूसारखा प्राणघातक आजाराचं गडद कपडे हे एक कारण होऊ शकतं. डेंग्यू आजार एडिज या मच्छराच्या चावण्यामुळे होतो. हा मच्छर गडद रंगाकडे आकर्षित होतो. विशेष म्हणजे डेंग्यूचा मच्छर फार उंच उडू शकत नाही. याच कारणामुळे डॉक्टरांच्या मते पावसाळ्यात शक्यतो गडद रंगाचे मोजे वापरणं टाळावं.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. केके अग्रवाल म्हणाले की, लोक सकाळ- संध्याकाळ जॉगिंग करायला किंवा फिरायला जातात त्यांनी याबाबतीत विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. फिरायला जाताना फिकट रंगाचे आणि पूर्ण हाताचे कपडे घालावेत. सफदरजंग रुग्णालयाचे डॉ. जुगल किशोर यांनी अमर उजालाला माहिती दिली की, डेंग्यूचे मच्छर ओळखणं फार सोप्प आहे. ते इतर मच्छरांपेक्षा दिसायला पूर्णपणे वेगळे असतात. ते गडद रंगाचे असतात आणि त्यावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असतात.

हे मच्छर स्वच्छ पाण्यावर तरंगतात. त्यामुळे घरात आठवड्यातून दोनदा जमा झालेलं पाणी स्वच्छ करणं गरजेचं आहे. तसेच डेंग्यूचे मच्छर फार उंचावर उडू शकत नसल्यामुळे ते बहुतांश वेळेला पायालाच चावतात. याच कारणामुळे शक्यतो पूर्ण पँट आणि शूज घाला आणि फिकट रंगाचे मोजे घालायला प्राधान्य द्या.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

जाणून घ्या लो ब्लड प्रेशरची कारणं आणि लक्षणं

Loading...

दररोज दोन केळी खाल्ल्यावर शरीरात होतील हे बदल

भर पावसात डेटवर जात असाल तर या गोष्टी एकदा वाचाच!

VIDEO : आदित्य ठाकरे लालबाग राजाच्या चरणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...