Home /News /lifestyle /

दैनंदिन राशीभविष्य: 'या' राशीवर आज होणार पैशांचा पाऊस; तुमची रास तर नाही ना? वाचा आजचं भविष्य

दैनंदिन राशीभविष्य: 'या' राशीवर आज होणार पैशांचा पाऊस; तुमची रास तर नाही ना? वाचा आजचं भविष्य

आज दिनांक २७ जून२०२२ वार सोमवार. आज ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी. आज चंद्र वृषभ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक २७ जून२०२२ वार सोमवार. आज ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी. आज चंद्र वृषभ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज द्वितीय स्थानातील चंद्र भ्रमण बरे असून काही ताण असेल तर विचलित होऊ नका. मंगळ राहू धार्मिक आस्था निर्माण करतील. दिवस शुभ. वृषभ राशीच्या स्व स्थानातील चंद्र आज आर्थिक, व्यावसायिक लाभ देईल. प्रकृती ठीक राहील. दशम स्थानातील शनि अनुकूल असून मंगळ व्यय देईल. शुभ दिवस. मिथुन आज व्यय स्थानातील चंद्र संतती आणि तुमच्या कामकाजासाठी त्रास दायक आहे. खर्च होतील . प्रकृतीची काळजी घ्या असे ग्रह सुचवीत आहे. . दिवस मध्यम जाईल. कर्क चंद्र आज विविध क्षेत्रात विशेष घडामोडी घडवून आणेल. आर्थिक लाभ संभवतो. तुमच्यावर नवीन जबाबदारी येईल. अष्टम शनि पाठदुखी पासून जपा . दिवस शुभ. सिंह आज दिवस अनेक घटना घडवणारा आहे. आज मन आशंकित राहील. भावंडं भेट होईल.. दिवस जोडीदाराला आर्थिक लाभ घडवेल. मध्यम दिवस. कन्या आज दिवस उत्तम असून प्रकृती ठीक असेल.काही विचित्र अशी हुरहूर लागून राहिलं. कार्यक्षेत्रात भरपूर काम कराल . प्रवास योग येतील. काळजी घ्या. दिवस ठीक आहे. तुला राशीच्या अष्टम स्थानात चंद्र जीवनात ताण निर्माण करेल. खरेदी कराल. आर्थिक दृष्ट्या कष्ट. घरात काही विशेष घटना घडतील. दिवस मध्यम आहे. वृश्चिक चंद्र भ्रमण प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक घडामोडी ,अध्यात्मिक व्यक्तींची भेट घडवून आणेल. स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च कराल. अनपेक्षित अडचणी येतील. दिवस मध्यम. धनु चंद्र भ्रमण आज कार्यालयीन जीवनात यश देईल. संततीशी मंगळ मतभेद करील. जोडीदाराची काळजी लागून राहील. दिवस मध्यम.. मकर राशीच्या तृतीय स्थानातील गुरू भ्रमण प्रवासाचे योग आणेल. त्यात तुम्ही अडकून जाल.मंगळ गुरू खर्चाचे नवीन मार्ग तयार करतील. तसेच प्रप्तीही वाढेल. दिवस चांगला आहे. . कुंभ चंद्र चतुर्थ स्थानात आहे. शनि कायदा पाळा असे सांगत आहे.आर्थिक लाभाचे मार्ग मिळतील. मात्र सांभाळून असा. दिवस मध्यम जाईल. मीन कौटुंबिक लाभ देणारा हा दिवस आहे. समारंभ होईल. थोडे तणाव पूर्ण वातावरण राहील. वैवाहिक जीवन नाराज राहील. दिवस मध्यम आहे. शुभम भवतू!!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या