मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दैनंदिन राशीभविष्य: मीन राशीला आज मिळेल कार्यक्षेत्रात नवीन संधी; कसा जाईल तुमचा दिवस? जाणून घ्या

दैनंदिन राशीभविष्य: मीन राशीला आज मिळेल कार्यक्षेत्रात नवीन संधी; कसा जाईल तुमचा दिवस? जाणून घ्या

आज दिनांक १५ जुलै २०२२.शुक्रवार. आज आषाढ कृष्ण द्वितीया .चंद्र आज मकर राशीत असेल. चंद्र शनि विषयोग होईल. या काळात उपासना व दान करणे इष्ट राहील. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य

  • Published by:  Atharva Mahankal

आज दिनांक १५ जुलै २०२२.शुक्रवार. आज आषाढ कृष्ण द्वितीया .चंद्र आज मकर राशीत असेल. चंद्र शनि विषयोग होईल. या काळात उपासना व दान करणे इष्ट राहील. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य

मेष

राशी च्या दशमात शनि चंद्र मनस्थिती किंचित दोलायमान करतील. मंगळ राशी स्थानात राहूसोबत ही ग्रहस्थिती अचानक घडामोडी घडवेल. घरात फार काम पडेल. आई वडिलांची प्रकृती जपा .दिवस मध्यम.

वृषभ

राहू मंगळ भ्रमण स्त्रियांना चांगले नसून, गुरू कार्यक्षेत्रात मदत करेल. शारीरिक ताण निर्माण होईल . धनस्थानात सूर्य काही विशेष आर्थिक लाभ देईल . दिवस चांगला.

मिथुन

राशीच्या अष्टमात चंद्र शनि घातक असून काही नवीन अडचणी येतील. महत्वाचे संपर्क होतील. आर्थिक व्यय होतील . प्रकृती सांभाळा. दिवस मध्यम जाईल.

कर्क

चंद्र आज सप्तमात शनीसोबत आहे. घरी व कार्यक्षेत्रात धावपळ होईल.जास्तीची जबाबदारी येईल. प्रकृती मध्यम राहू. मंगळ दशमात तर रवि व्यय स्थानात असून जवळच्या नातेवाईकांना अशुभ वैवाहिक आयुष्यात ताण देणारा दिवस आहे .मन उदास वाटेल. ग्रहांचा प्रभाव जाणवेल. दिवस मध्यम जाईल.

सिंह

राशीच्या अष्टम स्थानातील गुरु काहीसे संथ वाटेल असे दिवस जातील. षष्ठ चंद्र शनि अडचणीतून विजय मिळवून देतील प्रकृती जपा.दिवस मध्यम जाईल.

कन्या

राशीच्या पंचम स्थानात शनि चंद्र संततीला त्रासदायक ठरेल.सामाजिक उपक्रमात भाग घ्याल.वैवाहिक प्रस्ताव येतील.दिवस मध्यम.

तुला

शनि चतुर्थ चंद्र एकत्र आहेत. कार्यालयात काळजी घ्या.l घरामध्ये मोठे खर्च निघतील. जोडीदाराची काळजी घ्या. भेटी होतील . सप्तम मंगळ राहू वैवाहिक जीवनात ताण आणेल. दिवस बरा जाईल.

वृश्चिक

राशीच्या तृतीय स्थानातील शनि चंद्र पराक्रम वाढवतील .भावंडांशी मतभेद वाढतील. प्रवास योग येतील.संततीला शुभ काळ आहे.दिवस उत्तम.

धनु

तृतीय शनि आणि चतुर्थ गुरू शुभ असून घरामध्ये सुधारणा घडवून आणतील . सप्तम स्थानात चंद्र रवि आहे. अमावस्या जोडीदाराच्या काळजीची जाईल. दिवस शांत पणे घालवा.

मकर

शनि महाराज काही विशिष्ट ताण देतील. चंद्र आरोग्य चिंता निर्माण करेल. जोडीदार आनंदी राहील. तुम्ही घरात व्यस्त राहाल. खर्च जपून करा. दिवस मध्यम.

कुंभ

धन स्थानातील गुरू आर्थिक लाभ देतील. बारावा वक्री शनि जोडीदाराला त्रासदायक ठरेल. चंद्र राहू जपून राहण्याचे संकेत देत आहे. रावस टाळा.iसंततीची काळजी घ्या . दिवस मध्यम जाईल

मीन

राशीतील गुरू आर्थिक उलाढाल दाखवत आहे. लाभ होतील. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. दिवस गृह चिंतेचा ठरेल.मंगळ स्वभावात तेज आणेल.शांत रहा.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope