Home /News /lifestyle /

Daily Horoscope: या राशीची प्रत्येक प्रार्थना होईल पूर्ण; कसा असेल 4 जुलैचा तुमचा दिवस? जाणून घ्या

Daily Horoscope: या राशीची प्रत्येक प्रार्थना होईल पूर्ण; कसा असेल 4 जुलैचा तुमचा दिवस? जाणून घ्या

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 4 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 4 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमचं म्हणणं नीट मांडा तसं न केल्यामुळे तुमच्या कामाबद्दल गैरसमज होतात किंवा त्याला उशीर होऊन तुम्हाला योग्य रिझल्ट्स मिळत नाहीत. दूर राहणारं कुणीतरी तुम्हाला मानसिकदृष्ट्या छळतंय. LUCKY SIGN – A sprrow वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) पैसे कमवण्यासाठी कदाचित तुमच्या आदर्शांच्या विपरित गोष्टीकडे आकर्षित व्हाल. शक्य तेवढं टाळायचा प्रयत्न करा. आता तुमच्या आयुष्यात नव्याने घडणाऱ्या घटनांत तुमच्या कौशल्यांसमोर नवं आव्हान उभं राहील. LUCKY SIGN – A duck मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्या कामाचा वार्षिक आढावा लवकरच घेतला जाणार असल्याने तुंबलेली कामं पूर्ण करा. कामचुकारपणाचे काही पुरावे सापडले तर त्याचा पुढच्या वर्षाच्या कामावर विपरित परिणाम होऊ शकतो. रोज खेळ खेळा. LUCKY SIGN - A peepal tree कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्हाला ज्यांची आठवण येते आहे त्यांना भेटण्यासाठी हा दिवस उत्तम आहे तसंच सकारात्मक आठवणींत रमण्यासाठीही दिवस छान आहे. मित्रासोबत बाहेर गेल्यास संध्याकाळ चांगली जाईल. LUCKY SIGN - A clay bowl सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) दुसरा कुणीतरी तुमच्यासाठी सुयोग्य स्थिती निर्माण करेल असं जर तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो. तुम्ही स्वतंत्रपणे हे करू शकता. तुम्हाला स्वत: ला पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी प्रेरणा हवी आहे. लवकरच नव्या नोकरीची संधी मिळेल. LUCKY SIGN - An amusement park कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) आजचा दिवस पैसे, नव्या संधी आणि कौतुक स्वीकारण्याचा आहे. असे दिवस क्वचितच येतात पण तसा दिवस आला की तुम्ही लक्षपूर्वक आणि वास्तवात राहून त्याचा आनंद घ्यायचा असतो. आरोग्याची काळजी घ्या. LUCKY SIGN - A museum तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमचं म्हणणं उत्तमपणे मांडण्यासाठी तुम्ही भूतकाळात काय प्रयत्न केलेत, कोणत्या आव्हानांना तोंड दिलंय हे सांगायची तुमची तयारी असायला हवी. तुम्ही केलेलं काम सगळ्यांना माहीत नसतं. अनुभवातून शिका आणि पुढे जा. शाळकरी मुलं आणि शिक्षकांसाठी चांगला दिवस. LUCKY SIGN - A pyrite crystal वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) मानसिकदृष्ट्या शीणला असाल तर एक चक्कर मारून या. तुम्ही दिवसभरात जेवढं फिराल तेवढा दिवस चांगला जाईल. त्यामुळे एकाजागी बसू नका. त्यामुळे उठा आणि काहीतरी कृती करा. आज जादुई क्षण आयुष्यात येईल. LUCKY SIGN – A crystal glass धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एकावेळी अनेक गोष्टी घडल्याने तुमच्या मनावर ताण येईल. कदाचित तुम्हाला जी गोष्ट करताय तिचा फेरविचार करावासा वाटेल पण चाललंय त्यावर विश्वास ठेवा. तुमच्या पालकांना आता तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. LUCKY SIGN - A wooden trunk मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमच्या प्रार्थना हळूहळू पूर्ण होताहेत. प्रत्येक किरकोळ चुकीसाठी तुम्ही दुसऱ्याला दोष देऊन उपयोगाचं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही सुरू असतं आणि तुमचा दृष्टिकोनही वेगळा असू शकतो. तुमच्याबाबत घडणाऱ्या गोष्टी लवकरच सत्यात उतरणार आहेत. LUCKY SIGN - A banayan tree कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्ही कितीही तयारी केलीत तरीही काहीतरी राहिलंच असं तुम्हाला वाटतं पण जगणं तुम्हाला सगळं एकत्र करायला भाग पाडतं. तुमच्या स्वप्नांनुसार जगायला तुम्ही तयार आहात. स्वत: बद्दल खूप कठोर होऊ नका. LUCKY SIGN - A field मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) सकाळी कामं पूर्ण करण्याचा ताण जाणवेल पण नंतर नाहीसा होईल. दुपारी मित्रांसोबत काळ घालवाल आणि आनंदी रहाल. कामं बाकी असली तरीही दुपार आनंददायी जाईल. LUCKY SIGN – mirror work
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या