Home /News /lifestyle /

Daily Horoscope: मेष राशीचे सगळे प्रॉब्लेम्स होतील दूर; कसा असेल 7 जुलैचा दिवस? जाणून घ्या भविष्य

Daily Horoscope: मेष राशीचे सगळे प्रॉब्लेम्स होतील दूर; कसा असेल 7 जुलैचा दिवस? जाणून घ्या भविष्य

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 7 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 7 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) अलीकडेच निर्माण झालेली एखादी समस्या अखेर सुटेल. काही पार्टनरशिप्स असल्या, तर त्या अधिक फायदेशीर ठरतील. नवं वाहन विकत घेण्याचा विचार करत असलात, तर त्यासाठी आता योग्य वेळ आहे. कोणावर डूख धरू नये किंवा वाईट चिंतू नये. LUCKY SIGN - A blue sapphire वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) परफॉर्मन्सची तयारी करत असलात, तर रिहर्सल, तसंच प्रॅक्टिस सेशन्समध्ये आजचा वेळ जाईल. विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक आदींचा दिवस नेहमीपेक्षा खूप बिझी असेल. कामाच्या ठिकाणी एखादी सकारात्मक घडामोड घडण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A silicon mould मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) आजचा दिवस अचानक काही शॉपिंग होण्याचा आहे. ते ऑनलाइन असू शकेल किंवा प्रत्यक्ष अर्थात फिजिकलही. एखादी छोटी ट्रिप होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक गरज म्हणून ही ट्रिप होऊ शकेल. तुमच्या अनुपस्थितीत काम योग्य पद्धतीने आणि नियंत्रणाखाली होत आहे ना, याची काळजी घ्या. विश्वासातल्या नसलेल्या, अनोळखी ठिकाणी खाणं टाळा. LUCKY SIGN - A sand rose stone कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) माणसं, फोटोग्राफ्स, फोन कॉल्स आदींच्या माध्यमातून जुन्या आठवणींत रमण्याचा दिवस. अनेकदा तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप थकून गेल्यासारखं वाटेल. एखादा चांगला ग्राउंडिंग एक्सरसाइज किंवा ध्यानधारणा यांमुळे तुम्हाला संतुलन साधायला मदत होईल. LUCKY SIGN - A yellow citrine सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आजचा दिवस तुमची वैयक्तिक कामं पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे. तुम्ही आता ज्या बदलांबद्दल विचार कराल, त्यांचे फायदे तुम्हाला दीर्घ काळानंतर मिळतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही एखादी नवी यंत्रणा तयार कराल. त्या यंत्रणेवर अंतर्गत टीका होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A pyrite कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) दीर्घ काळापासून तुम्ही भेटला नसाल अशा मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला एकांतात काही वेळ घालवण्याची तीव्र इच्छा होईल. आगामी काळ खूप बिझी असेल, असे संकेत आहेत. त्यामुळे आत्ता रिलॅक्स राहा. LUCKY SIGN - A black crystal तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) आज एखादी इच्छा मनात येईल आणि ती एरव्हीपेक्षा खूपच लवकरच प्रकट होईल. आजचा दिवस कृतीचा आहे, मानसिकदृष्ट्या क्रियाशील राहण्याचा आहे. तुम्ही दीर्घकालीन प्लॅन्स करण्याचा विचार करू शकता. LUCKY SIGN - A dreamcatcher वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) प्रिय व्यक्तीकडून एखादी अशी कृती केली जाईल, की तुम्हाला सरप्राइज मिळेल. आजचा दिवस काम करण्यासाठी, प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी अत्यंत सुंदर आहे. एखादी ओळखीची व्यक्ती नवी ऑफर देऊ शकेल. ती ऑफर विचार करण्याजोगी असेल. तुमच्या दृष्टीची/डोळ्यांची काळजी घ्या. LUCKY SIGN - A rose quartz धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) प्रलंबित कायदेविषयक प्रकरणांकडे लक्ष देण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. एखादी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काढलेला उपाय चांगला ठरेल आणि त्यामुळे तुमची प्रतिमा उत्तम होईल. आज कामाला प्राधान्य दिलं जाईल. LUCKY SIGN - A blue tourmaline मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) अनेकदा असं होतं, की रिलेशनशिपमध्ये बऱ्याच अपेक्षा धरल्या तर तुम्ही दुखावले जाता. काही गोष्टी तुमच्या बाजूने घडत नसतील, तर सोडून द्या. एखादी नवी गोष्ट शिकून आज तुम्ही स्वतःलाच सरप्राइज द्याल. LUCKY SIGN - A lush garden कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) आजचा दिवस बिझी असेल. बाजारपेठेत फेरी घडण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाचा उत्तरार्ध शांततेत जाण्याची शक्यता आहे. प्रचंड प्रमाणात खाणं टाळावं. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. LUCKY SIGN - A rose gold ring मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमच्या बजेटचं नियोजन अधिक हुशारीने करा. तुम्ही गृहीत धरलेल्यापेक्षा अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. सौम्य डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. दिवस रूटीननुसार व्यतीत करावा. LUCKY SIGN - A feather
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या