मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Daily Horoscope: 'या' राशींना मिळणार नव्या संधी; कसा असेल 20 जुलैचा दिवस? जाणून घ्या भविष्य

Daily Horoscope: 'या' राशींना मिळणार नव्या संधी; कसा असेल 20 जुलैचा दिवस? जाणून घ्या भविष्य

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 20 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

शिल्लक राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. कामाच्या संदर्भातल्या काही गोष्टींबद्दल तुमच्या स्ट्राँग इन्ट्यूशनचं ऐका. वादविवादाच्या प्रसंगी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

LUCKY SIGN - A tea estate

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

आजच्या दिवसाची ऊर्जा तुम्हाला अनुकूल आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या नव्या कामात पुढाकार घ्याल आणि नव्या संधी मिळवाल. कोणी तरी फेव्हर करण्याबद्दल विचारलं, तर तुम्ही नम्रपणे नकार देऊ शकता. लवकरच एखाद्या आउटिंगचं नियोजन करा.

LUCKY SIGN - Two boats

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुमची एखादी दुबळी बाजू योग्य पद्धतीने झाकणं तुम्हाला कदाचित शक्य होणार नाही. त्यामुळे ती दुसऱ्यांना दिसण्याची शक्यता आहे. प्रगती करण्यासाठी काही वाटाघाटींच्या क्लृप्त्या लढवाव्या लागतील. एखादा सहकारी मदतीसाठी विचारणा करील. ती गोष्ट कदाचित स्वार्थी असू शकेल.

LUCKY SIGN - Pebbles

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी पुन्हा जोडले जाण्याची शक्यता आहे. बाहेरची एखादी अपॉइंटमेंट हवामानाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलावी लागेल. तुम्ही एखाद्या चांगल्या मोहिमेला पाठिंबा द्यायचं ठरवत असलात, तर तुम्हाला आता एखादी संधी मिळू शकेल.

LUCKY SIGN - A camera

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुम्ही एखाद्या अचानक ठरवण्यात आलेल्या प्लॅनचा भाग असाल. आजचा दिवस तुमचे आवडते अन्नपदार्थ आणि ट्रीट्सचा असेल. काही प्रलंबित कामं वेग पकडतील. तुमचा सपोर्ट स्टाफ एखादी समस्या घेऊन येण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - Pearls

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

कामाच्या ठिकाणचं वातावरण अखेर अनुकूल होईल. मित्रासोबत संवाद साधणं बऱ्याच काळापासून राहिलं होतं. ते तुम्ही आता कराल. कामाच्या ठिकाणी, तसंच घरीची तुमचं पेपरवर्क सुस्थितीत आणि योग्य ठिकाणी ठेवा. तुम्हाला झोप कमी होत असल्यासारखं वाटेल.

LUCKY SIGN - Doorstep

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

काळजी घेणारं बनणं म्हणजे दुबळं होणं नव्हे. तुमची बलस्थानं पुढे मांडा. नवी रेसिपी ट्राय करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या आरोग्याची अतिरिक्त काळजी घ्या.

LUCKY SIGN - A red scraf

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

वाईट स्वप्नं म्हणजे आपल्या सुप्त मनातली काही भीती असते. ती तुम्हाला काही दिशा दाखवू शकते. विरुद्धलिंगी व्यक्ती तुमचं लक्ष आकर्षित करून घेऊ शकते. आज जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क साधून दिवस संस्मरणीय करा.

LUCKY SIGN - A brick wall

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुम्हाला जवळचं कोणी तरी मिस करत आहे. कुटुंबीयांसाठी वेळ काढा. त्यांना त्याची गरज आहे. वीकेंडला आउटिंग होण्याची शक्यता आहे. तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, ती कदाचित रूटीन मेडिकल चेकअपमधून मिळतील.

LUCKY SIGN - A neon sign

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

आजच्या दिवसावर जुन्या स्मृतींचं राज्य असेल. वस्तुस्थितीची खात्री करून घेणं फायद्याचं ठरेल. तुमचं मूल तुमच्याशी कदाचित काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करू इच्छित असेल. जुनी समस्या सोडवण्यासाठी एखादा नवीन प्लॅन आखा.

LUCKY SIGN - A glass bottle

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुमची भीती आता नियंत्रणात असेल. आता काळ बदलला आहे. त्यामुळे आता वाईट स्वप्नं पडणार नाहीत. गेल्या काही महिन्यांत तुम्ही जे काही साध्य केलं आहे, त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटेल. तुमच्याकडे एखादी जास्तीची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A peepal tree

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

तुम्ही कुटुंबाचा भावनिक आधार आहात आणि कुटुंबाची प्रभावी साखळी आहात. कामाच्या ठिकाणी नव्या काँट्रॅक्टवर सह्या होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या व्यक्तींचा दिवस नेहमीपेक्षा बिझी असेल.

LUCKY SIGN - Migratory birds

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle