Home /News /lifestyle /

Daily Horoscope: सिंगल लोकांसाठी रविवार आणेल खूशखबर; कसा असेल 19 जूनचा तुमचा दिवस? जाणून घ्या

Daily Horoscope: सिंगल लोकांसाठी रविवार आणेल खूशखबर; कसा असेल 19 जूनचा तुमचा दिवस? जाणून घ्या

 राशिभविष्य

राशिभविष्य

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी घेतलेले निर्णय योग्य ठरले नाहीत. तुमच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तींमुळे इतरांचे तुमच्याबद्दल चुकीचे मत तयार होईल. पैशांच्या बाबतीत मिळालेली एखादी चांगली बातमी तुम्हाला आनंदी ठेवेल. सिंगल व्यक्तींसाठी विवाहाचे योग्य स्थळ चालून येईल. जुने रखडलेले प्रश्न लवकर सोडवा. LUCKY SIGN – A Canopy वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) कामाच्या ठिकाणी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी एखाद्या वरिष्ठाचा सल्ला उपयोगी येईल. तुमच्या सोबत काम करणारे सहकारी समंजस आणि तुमच्या मदतीसाठी तत्पर आहेत. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी थोडा अडचणीचा काळ आहे. जर नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर योग्य मार्गदर्शन घ्या. LUCKY SIGN – A Rain drop मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) काही दिवसांपूर्वी एखादं अवघड वाटणारे काम आता सहज पूर्ण होईल. यामुळे तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एखादा नवउद्योजक तुमच्याकडे विशेष प्रस्ताव घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी संशय मनात ठेवल्यामुळे त्याचा कामाच्या वेगावर परिणाम होईल. एखादी तुमच्या बजेमध्ये बसणारी सोलो ट्रिप करणं शक्य होईल. एखादी रोमांचक अशी प्रोजेक्ट संकल्पना नजरेस पडेल. LUCKY SIGN – Fresh paint कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही एरव्ही ज्या उस्फूर्तपणे काम करता, तो जोश आज दिसणार नाही. कुटुंबात घडलेल्या काही नाट्यमय गोष्टी आता अवास्तव वाटतील. भूतकाळातील केलेल्या काही कामांमुळे तुम्ही पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात याल. बाहेर फिरायला जाणं मानसिक आरोग्यासाठी फायद्याचं ठरेल. LUCKY SIGN – Crystal Therapy सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्ही जर यशस्वी उद्योग उभारण्याचं स्वप्न पाहत असाल, तर त्याचा पाया आत्ताच रचणं गरजेचं आहे. तुमचे काही हितचिंतकदेखील तुमच्या मदतीला येतील. कुटुंबातील एखादा मोठा वाद अनेकांसाठी त्रासदायक ठरेल. शाळकरी विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळेल. शॉपिंग केल्याने आनंद मिळेल. LUCKY SIGN – A Sitcom कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) केवळ कागदोपत्री शहाणपणा नाही, तर तुमच्या योजनांवर कृती करणं गरजेचं आहे. तुम्ही काही नवीन गोष्ट करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी आवश्यक गोष्टींचा शोध आताच सुरू करा. तुम्हाला भरपूर लोकांशी संपर्क साधावा लागेल. एखाद्या जुन्या सहकाऱ्याची मदत होईल. कुटुंबीयांचा तुम्हाला नेहमीप्रमाणे पाठिंबा राहील. बाहेरच्या व्यक्तींसोबत अधिक माहिती शेअर करू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. LUCKY SIGN – A Modern art painting तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमच्या भावना तुमच्या कामाच्या मध्ये आणू नका. अनेक लोक तुमची चूक होण्याची वाट पाहत आहेत. भूतकाळात तुमच्या बाजूने असणारी व्यक्ती आताही असेल, असे समजू नका. तुमचे मित्र काळजीपूर्वक निवडण्याची गरज आहे. तुमचं काम दाखवण्याची संधी तुम्हाला लवकरच मिळेल. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा, तुम्ही तिला टाळत आहात असा गैरसमज होईल. तुमच्या मनाने योग्य निवड करण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN – A Spoon वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) भूतकाळात घेतलेल्या एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर तुम्ही अजूनही विचार करत असाल, मात्र सध्याची परिस्थिती त्याला साथ देत नाही. तुम्हाला एखाद्या विषयावर बोलायचं असेल, तर सध्या ते टाळा. दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये पडण्याचा प्रयत्न करू नका. आता विचार न करता घेतलेल्या निर्णयांमुळे भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. तुम्ही बऱ्याच काळापासून ज्यावर काम करत आहात ते प्रकल्प आता आकार घेऊ लागतील. मानसिक तक्रारींना दूर करण्यासाठी नियमित मेडिटेशन करा. LUCKY SIGN – A bottle opener धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) आज बऱ्याच दिवसांनी आराम मिळेल. बऱ्याच गुंतागुंतीच्या गोष्टी सुटू लागतील. लग्नासाठी प्रस्ताव येतील, तसंच तुटलेलं रिलेशनशिपदेखील ठीक होण्याची चिन्ह दिसतील. महत्त्वाच्या व्यक्तींसोबत संवाद साधला जाईल. काही प्रभावशाली व्यक्तींची भेट होईल, ज्या भविष्यात तुमची मोठी मदत करू शकतात. स्वतःचं मत मांडण्यासाठी कचरू नका. तुमचा दृष्टिकोन मांडल्यामुळे कौतुक होण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या गेट-टुगेदरसाठी निमंत्रण मिळेल. LUCKY SIGN – A Butterfly मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमची प्रामाणिक भावना आणि हेतू यामुळे आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित होतील. आपणहून लोकांना असंच बोलण्यासाठी कॉल करणंही चांगली गोष्ट असते, हे लक्षात घ्या. तुमचा मैत्रीपूर्ण स्वभाव तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. तुम्हाला शक्य होणार नाही अशा गोष्टींची कमिटमेंट देणं टाळा. तुमच्या कुटुंबातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती तुमच्या फोनची वाट पाहत असेल. किचनमध्ये जबरदस्तीने काम करावं लागेल. LUCKY SIGN – A Candle stand कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) जर तुम्ही अति-सोशल असाल, आणि दर दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडत असाल; तर त्यावर थोडे निर्बंध आणण्याची गरज आहे. तुम्ही सध्याच्या परिस्थितीचा आनंद घेत असाल, मात्र त्याचा परिणाम तुमच्या कामावर होतो आहे, हे लक्षात घ्या. तुमचं कौशल्य आणि ज्ञान वाढवण्याची वेळ आता आली आहे. तुमचा सीव्हीदेखील आता अपडेट करणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या ज्युनिअरला तुमचं मार्गदर्शन आणि वेळ यांची गरज भासेल. तुम्हाला लेखनाची आवड असेल तर तुमचे लेख एकत्र करुन ते अधिकृतपणे प्रकाशित करण्याबाबत आता विचार करू शकता. क्रिएटिव्ह व्यक्तींना नव्या संधी मिळतील. आरोग्याबाबत काळजी घ्या, अन्यथा डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येऊ शकते. LUCKY SIGN – Calming music मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये पारंगत असाल, मात्र त्यांचा वापरही होणं गरजेचं आहे. तुमच्याकडून एखाद्याच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. तुम्ही आज जे काही आहात, त्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत घेतली आहे. मात्र, आज स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची गरज आहे. केवळ भौतिक संपत्ती गोळा करून तुम्ही जीवनात सर्व काही कमावलं आहे असं म्हणता येणार नाही. आयुष्यात समाधान मिळवण्यासाठी तुम्हाला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. तुमच्यावरील टीका ऐकून घ्या. LUCKY SIGN – A Symphony
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या