Home /News /lifestyle /

Daily Horoscope: वृश्चिक राशीच्या लोकांना होईल धनलाभ; कसा जाईल तुमचा 25 मेचा दिवस? वाचा सविस्तर

Daily Horoscope: वृश्चिक राशीच्या लोकांना होईल धनलाभ; कसा जाईल तुमचा 25 मेचा दिवस? वाचा सविस्तर

25 मेचं राशिभविष्य

25 मेचं राशिभविष्य

आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 25 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 25 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आज तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळतील. खासकरून तुमचा आर्थिक लाभ झाल्याच्या त्या बातम्या असतील. तुमच्या सभोवती अलीकडेच घडलेल्या काही घटना-घडामोडींमुळे तुम्हाला भरून आलं असेल. तुमच्या ओळखीची एखादी व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A yellow sapphire वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखाद्या नव्या व्यक्तीमुळे कुतुहल जागृत होईल. तसंच चित्त विचलितही होईल. गोंधळ होण्याच्या Receiving side ला असल्यासारखं तुम्हाला वाटेल. तुम्ही योग्य वेळी पूर्ण करू शकणार नाही असं वचन देऊ नका. LUCKY SIGN - A blue crystal मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) अलीकडेच पूर्ण केलेल्या एखाद्या असाइनमेंटमुळे तुम्हाला अगदी थकल्यासारखं वाटेल. पुढच्या आयुष्याचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला थोडी स्पेस हवी आहे. गरज असलेली एखादी व्यक्ती तुमच्या माध्यमातून मदत मिळण्यासाठी वाट पाहत असण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A silver ornament कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही तुमच्यासाठी शॉपिंगचं नियोजन केलं असेल, तर तुम्हाला त्यात गुंतून पडल्यासारखं वाटेल. कामाच्या ठिकाणी डेडलाइन्स पाळाव्या लागणार आहेत. घरगुती मदतनीसाकडून रूटीन कामामध्ये अडथळे आणले जाऊ शकतात. LUCKY SIGN - A grey pouch सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्ही पूर्वी नाकारलेला एखादा पर्याय आता परत एकदा समोर येण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीचं अति विश्लेषण केल्यामुळे योग्य ते रिझल्ट्स मिळत नाहीत. आजच्या दिवसात तुम्हाला काही तांत्रिक अडचणींना तोंड द्यावं लागेल. बॅकअप घेण्यास विसरू नका. LUCKY SIGN - A wooden stick कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) आव्हानात्मक काळात तुम्हाला अचानक एखादी सपोर्ट सिस्टीम सापडेल. एखाद्या व्यक्तीसोबत झालेल्या भेटीचे सकारात्मक परिणाम होतील. तुम्हाला थोडीफार घाई झाल्यासारखं वाटेल; पण लवकरच सगळं काही स्थिरावेल. LUCKY SIGN - A clay pot तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) एखादं गेट-टुगेदर तुम्हाला मोकळं होण्याची संधी देईल, त्यात अनेक इंटरेस्टिंग संवाद होतील. तुमचं कौतुक करणारी व्यक्ती या वेळी तुमचं लक्ष वेधून घेईल. Long Walk मुळे तुम्हाला बरीच गरजेची असलेली आणि तुम्ही शोधत असलेली स्पेस मिळेल. LUCKY SIGN - A gold ornament वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्हाला शक्ती असलेलं सत्तास्थान प्राप्त झाल्याचं लक्षात येईल. पैसे अधिक सहजपणे उपलब्ध होतील. तुम्ही ज्या गोष्टीबद्दल खूप हेतू ठेवाल, काही विचार कराल, ती लवकरच तुम्हाला अनुकूल होईल. कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याबरोबर वाद टाळावेत. LUCKY SIGN - A wooden spoon धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्हाला देण्यात आलेलं काम पुढे ढकललं जाईल किंवा तुम्हाला वेळेची कमतरता भासेल. त्यामुळे वेळेवर तयारीत राहणं उत्तम. तुम्हाला वडिलांनी काही काम सोपवलं असेल, तर ते केलं पाहिजे. तुमची मानसिक अवस्था शारीरिक क्रियांशी निगडित असू द्यावी. LUCKY SIGN - A leather bag मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) वेगळ्या प्रकारचा प्रवास खूप शांतता देऊ शकेल. काही जुने मित्र या आठवड्यात तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे विस्कळीत विचार एकत्र करून एक ठोस नियोजन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. LUCKY SIGN - A paper cup कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमच्या कामाचं एखाद्या नव्या व्यक्तीकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये काही अडचण असल्यासारखं वाटत असलं, तरी आता ते पुन्हा व्यवस्थित होण्याची शक्यता आहे. कोणाचं तरी नुकसान झाल्यास त्यातून कोणाचा तरी फायदा होऊ शकतो. LUCKY SIGN - Roses मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखाद्या वैद्यकीय समस्येमुळे तुमचं लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. तुमच्यासोबत काम करणाऱ्या अगदी जवळच्या जोडीदाराला काही घरगुती समस्या असण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्याचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. तुम्ही जे काही गृहीत धरलं आहे, ते खरं असण्याची शक्यता फारशी नाही. LUCKY SIGN - A green crystal
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या