मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Daily Horoscope: तुमच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता; कसा असेल 15 जुलैचा दिवस? जाणून घ्या भविष्य...

Daily Horoscope: तुमच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता; कसा असेल 15 जुलैचा दिवस? जाणून घ्या भविष्य...

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 जुलै 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

आजचा दिवस व्यक्त होण्यासाठी सुंदर आहे. तुम्ही तुमचे विचार लिहून ठेवायला सुरुवात कराल आणि लवकरच ती तुमची सवयच बनेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे. आज नवी ओळख होण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A pearl

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या प्रगतीला उशीर होण्यासाठी काही अज्ञात घटक जबाबदार आहेत. सखोल शोध घ्या. तुम्हाला जे काही परिणाम मिळतील, त्याने तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. एखाद्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत होईल.

LUCKY SIGN - A blue sapphire

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

एखादी शैक्षणिक संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचं ज्ञान अपग्रेड करणं किंवा कौशल्यवृद्धीशी ती संबंधित असावी. तुमचं कौतुक करणारी एखादी व्यक्ती आत्ता तुमच्यापासून दूर राहू इच्छिते.

LUCKY SIGN - A black tourmaline

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

कामाच्या ठिकाणी झालेल्या एखाद्या उत्साहवर्धक घोषणेमुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. तुमच्यात नवा उत्साह संचारेल, असे संकेत आहेत. तुमच्याविषयीचा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी कुटुंबीय तुमच्याशी चर्चा न करण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A lampshade

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

आगामी कौटुंबिक सोहळ्यासाठी तुमच्या सुरू असलेल्या उत्तम तयारीचं कौतुक होईल. दिवसात करायच्या कामांचे प्राधान्यक्रम योग्य प्रकारे ठरवून ठेवा, म्हणजे वेळ वाचेल. रूटीनचा अवलंब करून तुम्ही चांगलं काम करत आहात.

LUCKY SIGN - A labeled jar

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

कामाच्या ठिकाणच्या काही गंभीर मुद्द्यांकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. तुमची झोप पूर्ण होत असल्याची खात्री करा, जेणेकरून दिवसा अस्वस्थता येणार नाही. काही गरज नसलेली कामं टाळा. मित्र अचानक काही तरी प्लॅन करतील.

LUCKY SIGN - A garden

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना तुमच्याकडून अधिक लक्ष दिलं जाण्याची अपेक्षा आहे. काही गैरसमज असतील, तर दूर करा. क्रिएटिव्ह राहण्यासाठी, तसंच प्रगती करण्यासाठी तुमच्या मनाला रिफ्रेश होण्याची गरज आहे. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा छोटी ट्रिप प्लॅन करा.

LUCKY SIGN - A squirrel

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

गुंतागुंत टाळा. तुमच्या सभोवती जे काही आहे त्यातलं तुमच्यासाठी काय आहे आणि इतरांसाठी काय, हे सोप्या पद्धतीने स्पष्ट करा. नवं रूटीन स्वीकारण्याचा प्रयत्न करताना काही ताणाचे क्षण येऊ शकतात. तुमच्या बॉसकडून तुम्हाला फेव्हर केलं जाण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A parrot

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुमच्या आयुष्यात आलेली नवी, इंटरेस्टिंग व्यक्ती काही काळापुरतीच असेल. घरच्या आघाडीवर तुम्हाला लक्ष देण्याची गरज भासेल. बाहेरच्या व्यक्तीने केलेल्या ढवळाढवळीमुळे तुम्हाला त्रास होईल.

LUCKY SIGN - A red dress

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

आजच्या दिवसाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. नावीन्यपूर्ण कल्पना पुढे येतील आणि त्यातून तातडीने काही प्राप्त होण्याच्या दिशेने वाटचाल होईल. योग्य व्यक्तींची भेट होणं हे दिवसाचं वैशिष्ट्य असेल.

LUCKY SIGN - A yellow sapphire

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

कोणाला तरी कॉल करणं तुम्ही पुढे ढकलत आला असलात, तर आज ते काम करण्याची वेळ आली आहे. आता नियमितपणे वर्कआउट करणं वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक आहे. तुम्ही ज्या बिझनेसबद्दल काम करत आहात, त्यापासून काही लाभ होण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A green aventurine

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

आजचा दिवस व्यग्रतेचा असेल. डेडलाइन्स पाळाव्या लागतील. आज काही आउटडोअर व्हेंचर्स करावी लागतील. कामाचा ताण येईल; मात्र तुम्हाला पुरेशी मदत मिळेल.

LUCKY SIGN - An emerald

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle